News

एफएमसी इंडिया कृषिविज्ञान कंपनीने शुक्रवारी ऊस पिकासाठी नवीन प्री इमर्जंट तन नाशक, ऑस्ट्रल हर्बीसाईड लॉन्च करण्याची घोषणा केली. हे तणनाशक उसाच्या वाढीच्या अवस्थेत ब्रॉड स्पेक्ट्रम तण नियंत्रणाची नवीन पातळी प्रदान करते.

Updated on 04 July, 2022 1:33 PM IST

एफएमसी इंडिया कृषिविज्ञान कंपनीने शुक्रवारी ऊस पिकासाठी नवीन प्री इमर्जंट तन नाशक, ऑस्ट्रल हर्बीसाईड लॉन्च करण्याची घोषणा केली. हे तणनाशक उसाच्या वाढीच्या अवस्थेत ब्रॉड स्पेक्ट्रम तण नियंत्रणाची नवीन पातळी प्रदान करते.

ज्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी पिकाची मजबूत वाढ होण्यासाठी मदत करते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश आहे.

तसेच दरवर्षी ऊस उत्पादकांना तण आणि विविध गवतामुळे मोठे नुकसानीला सामोरे जावे लागते. रुंद पाने असलेल्या तणांचे नियंत्रण हे एक मोठे आव्हान राहिले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद - ऊस प्रजनन संस्था यांनी अंदाज वर्तवला आहे की, निसर्ग आणि तीव्रतेनुसार शेतात विविध तणांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ऊस उत्पादकतेवर दहा टक्के पासून ते 70 टक्क्यांपर्यंत  परिणाम होतो.

नक्की वाचा:तुमच्या शेतातील पिकांसाठी अंडा संजीवक वापरा आणि रिझल्ट पहा

 ऑस्ट्रल हर्बीसाईडची वैशिष्ट्ये

 या तणनाशकाची अनोखी दुहेरी कृती उसामध्ये पीक आणि तन वाढीमध्ये जी स्पर्धा होते यावेळेस तणमुक्त स्थिती ठेवण्यासाठी मदत करते.

हे नाविन्यपूर्ण मालकी उत्पादन सोल्युशन जमिनीच्या वर संरक्षणाचा एक थर बनवते. पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात तणाची उगवण थांबविण्यासाठी मदत होते. या सगळ्यामुळे उसाचे उत्पादन जास्त मिळते.

नक्की वाचा:ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात असल्यास रोपाची मुळे त्यात बुडवून लागवडी करा आणि फरक पहा

एफएमसी इंडियाचे अध्यक्ष, रवी अण्णावरपु म्हणाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ओस्ट्रल हर्बीसाईड चा परिचय तंत्रज्ञानावर आधारित, वैज्ञानिक उपायांद्वारे चांगले उत्पादन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. आम्हाला विश्वास आहे की, ओस्ट्रल तणनाशक

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्तम रीतीने प्रभावी तण नियंत्रण करून उत्पन्न सुधारण्यास मदत करेल. येत्या हंगामात ओस्ट्रल हर्बीसाईड 500 ग्रॅम आणि एक किलोच्या पॅकमध्ये देशभरातील आघाडीच्या रिटेल स्टोअर मध्ये उपलब्ध असेल.

नक्की वाचा:नवयुवकांनो! करत असाल शेतीत पदार्पण तर मिरची' लागवडी'पासून करा सुरुवात,सुरुवात ठरेल यशस्वी

English Summary: fmc launch pre ostral herbicide for cane crop that help to farmer for good production
Published on: 04 July 2022, 01:33 IST