News

सणांच्या काळात नेहमी फुलांचे भाव वाढलेले असतात. सध्या सर्व ठिकाणी लग्नसराई, मार्गशीर्ष उपवास आणि मंदिरे या काळात बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु अवकाळी पावसाचा परिणाम हा फुलशेती वर सुद्धा झालेला आहे. याचाच परिणाम हा फुलांच्या भावावर सुद्धा झालेला आहे. अवकाळी पावसामुळे फुलशेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे फुलांच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे.

Updated on 15 December, 2021 2:48 PM IST

सणांच्या काळात नेहमी फुलांचे भाव वाढलेले असतात. सध्या सर्व ठिकाणी लग्नसराई, मार्गशीर्ष उपवास आणि मंदिरे या काळात बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु अवकाळी पावसाचा परिणाम हा फुलशेती वर सुद्धा झालेला आहे. याचाच परिणाम हा फुलांच्या भावावर सुद्धा झालेला आहे. अवकाळी पावसामुळे फुलशेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे फुलांच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे.

बाजाराचे गणित:-


बाजाराचे एक साधे गणित आहे. मालाच्या उत्पादनात घट झाली की भाव हे वाढतच राहतात. मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी झाल्यामुळे फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सध्या लग्नाचा आणि उपवासाचा काळ आहे त्यामुळे बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाने सर्वच पिकाचे नुकसान केले आहे. त्याचा परिणाम हा फुलशेती वर सुद्धा झालेला आहे. फुलशेती चे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे फुलांचे भाव दुप्पट वाढले आहेत.

महिनाभर फुलांचा सुगंध दरवळणार:-


सध्या बाजारात फुलांची कमतरता भासत आहे त्यामुळे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या महिन्या पेक्षा या महिन्यात फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. बाजारात झेंडू, निशिगंध, शेवंती, जरबेरा या फुलांच्या किंमतीत दुपटीने वाढ झालेली आहे. व्यापारी वर्गाच्या अंदाजानुसार या महिन्यात फुलांना अशीच मागणी राहिली तर फुलांचे भाव अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.


भाव वाढण्याचे कारण:-

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका कांदा, फळबागा आणि फुलशेती याला बसला आहे. या नुकसनामुळे फुलांचे उत्पन्न घटले आहे तसेच बाजारातील वाढती मागणी आणि फुलांचा तुटवडा यामुळे फुलांचे भाव मोठया प्रमाणात वाढलेले आहेत.

बाजारातील फुलांचे दर:-


सध्या बाजारात फुलांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. आधी बाजारात निशिगंध हे फुल 50 ते 60 रुपये किलो या भावाने मिळत होते परंतु आता तेच फुल 100 ते 120 रुपये प्रति किलो या भावाने विकले जात आहे. तसेच झेंडू चा भाव हा 70 ते 90 रुपये प्रति किलो विकला जात होता परंतु सध्या बाजारात झेंडूला 150 ते 200 रुपये प्रति किलो भावाने विकले जात आहे. तसेच शेवंती हे 80 ते 100 निशिगंध 100 ते 150 रुपये प्रति किलो या भावाने विकले जात आहेत. तसेच 5 रुपयांना मिळणारे गुलाबाचे फुल हे 15 रुपयांना विकले जात आहे. एकंदरीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसनामुळे फुलांचे भाव हे दुपटीने वाढले आहेत.

English Summary: Flower prices double in Ain Lagnasarai, 50 per cent decline in flower production due to unseasonal rains
Published on: 15 December 2021, 02:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)