News

भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. आपला देश अनेक पिकांच्या उत्पादनात जगात अग्रेसर देश आहे जैविक विविधता असलेला शिवाय विविध पिकांची लागवड करून जगात अग्रेसर देश म्हणून आपल्या देशाला ओळखले जाते. शिवाय भारतात पिकलेल्या अन्नधान्याची आयात निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.

Updated on 24 September, 2022 4:38 PM IST

भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. आपला देश अनेक पिकांच्या उत्पादनात जगात अग्रेसर देश आहे जैविक विविधता असलेला शिवाय विविध पिकांची लागवड करून जगात अग्रेसर देश म्हणून आपल्या देशाला ओळखले जाते. शिवाय भारतात पिकलेल्या अन्नधान्याची आयात निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.

सध्या शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडून आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर तसेच नवनवीन विकसित प्रणाली, आधुनिक बियाणी आणि यंत्रसामग्री यामुळे शेतीमध्ये बदल घडून आले आहेत शिवाय कमी वेळेत जास्त काम होऊ लागले आहे. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळू लागल्यामुळे पीक पद्धती मध्ये सुद्धा बदल घडून आले आहेत. सुरुवातीस पीक ही हंगामानुसार घेतली जायची परंतु आता कोणत्याही हंगामात कोणतीही पिके घेऊन जास्त उत्पादन काढण्याच्या हेतुमुळे पीक पद्धती मध्ये बदल घडून आला आहे.


शेतकरी वर्गाचा फुलशेती कडे कल:-
भारतात सुरुवातीच्या काळात फक्त रब्बी आणि खरीप यामधील हंगामी पिके फक्त घेतली जायची याचरोबरीने काही ऊस, कापूस, या सारखी व्यापारी पिके सुद्धा घेत असत परंतु अलीकडच्या काळात शेतकरी वर्गाचा कल आणि भुसार पिकांकडे बघण्याचा कल हा बदलला आहे. सध्या च्या काळात शेतकरी कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने तसेच कमी कष्ट यासाठी फुलशेती आणि फळ शेती कडे वळून अधिक फायदा कमवत आहे.

हेही वाचा:-यामाहा कंपनीने केले AEROX 155 चे मॉन्स्टर एनर्जी मोटोजीपी एडिशन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

 

ग्लॅडिओलस:-
ही एक कंदवर्गीय फुल आहे. बाजारात प्रचंड मागणी तसेच नेहमी उच्च भाव यामुळे या फुलाला बाजारात प्रचंड प्रमाणात मागणी सुद्धा आहे. व्यापाराच्या दृष्टीने हे अत्यंत फायदशीर आणि महत्वाचे फुल आहे.भारतामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई, बंगळूर आणि पुणे या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. ग्लॅडिओलस ला बाजारात चांगले दर मिळत असल्याने दिवसेंदिवस याचे लागवड क्षेत्र वाढत आहे.

हेही वाचा:-9 महिन्यात पारंपरिक पद्धतीने शेती करून कमवले तब्बल 22लाख रुपये, वाचा सविस्तर

 

आवश्यक हवामान:-
कडक उन्हाळा आणि सततचा जोरदार पाऊस हा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलसची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख मानले जातात. तसेच रब्बी आणि खरीप हंगाम हे  फुलासाठी चांगले असतात. फुलझाड लागवडी साठी योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी तसेच काळी माती आवश्यक तसेच सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करताना दोन ओळींत ३० सेंमी व दोन कंदांत १५ ते २० सेंमी अंतर ठेवावे.

English Summary: Floriculture: Cultivation, management of gladiolus flower. Read in detail, huge demand in the market.
Published on: 24 September 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)