महाराष्ट्र राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे जे की काही ठिकाणी महापूर सुद्धा आल्यामुळे मुंबई बाजार समीतीमध्ये बाहेरून जो भाजीपाला येत आहे त्याला चांगलाच फटका बसलेला आहे.पाहायला गेले तर भाजीपाला दरामध्ये चांगलीच घसरण पाहायला भेटत आहे तसेच महापुरामुळे जे की पाऊस जोरात चालू असल्याने ग्राहक घराच्या बाहेर पडण्यास हलगरजी करत आहेत त्यामुळे मार्केट मध्ये जो भाजीपाला आहे तो खराब होत निघालेला आहे. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला एका जागी पडून राहिलेला आहे.
मुंबई मधील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ६५० गाड्यांची भाजीपाला मार्केट मध्ये आवक झालेली आहे परंतु ग्राहकांचाच पत्ता नसल्याने बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला आहेत तसाच पडून राहिलेला आहे.पश्चिम महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यात जोरात पाऊस पडला आहे जसे की सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा व नाशिक अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे तिथे असलेला भाजीपाला पूर्णपणे भिजून मार्केट मध्ये आलेला आहे जे की तेथील व्यापाऱ्यांनी भाजीपाला चांगल्या प्रमाणात सुखावा म्हणून अंथरलेला आहे.
हेही वाचा:कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत 1631 भूमिहीनांना जमिनी
परंतु ग्राहक च नसल्याने कमीत कमीत १०० गाड्यांचा भाजीपाला तसाच शिल्लक पडल्याचे चित्र दिसून येत आहे.पावसामुळे ग्राहक बाजारात नसल्याने काही भाजीपाला सडून गेल्यामुळे तो तेथील व्यापाऱ्यांना फेकून देण्यास भाग पाडत आहे, फेकून दिलेला माल आपल्याला तेथील बाजारातील आवारात दिसत आहे अशी परिस्थिती सध्या बाजार समितीमध्ये सुरू आहे.ग्राहक नसल्याने भाज्यांची खरेदी होत नाही आणि त्यामुळे भाजीपाला दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याचे तेथील व्यापारी सांगत आहेत.
भाज्यांच्या दरात घसरण:
मुंबई मधील बाजार समितीमध्ये जो भाजीपाला दिसत आहे त्यामधील सर्वच भाज्यांच्या दरामध्ये घसरण झालेली दिसत आहे जसे की कोणतीही भाजी असेल ती भाजी तुम्हाला २० रुपये प्रति किलोच्या खालीच विकलेली दिसेल असे तेथील व्यापारी वर्ग सांगत आहे. शिमला मिरची पाहायला गेले तर त्यास फक्त प्रति किलो ४ ते ५ रुपये देण्यात येत आहेत तसेच १ फ्लॉवर ५ ते ६ रुपये, कोबी ला ८ ते ९ रुपये, वांगी प्रति किलो ५ ते ७ रुपये, काकडी प्रति किलो १० रुपये तसेच टोमॅटो २० रुपये प्रति किलो, कोथिंबीर ८ रुपये, मेथी ८ रुपये, पालकची भाजी ५ रुपये तर पुदिना ३ रुपये जोडी अशी विक्री भाजी मार्केट मध्ये सुरू आहे.
Published on: 26 July 2021, 09:27 IST