कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुराने यंदा सांगली जिल्ह्यात थैमान घातलं.कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतीला याचा जबर फटका बसला आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरापेक्षाही यंदा शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाले आहे.
सुमारे 40 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याचे अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून यंत्रणेकडून अद्याप पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही सांगली कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.सांगली जिल्ह्यासह सातारा,कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी परिणामी सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला. या महापुराने सर्व पातळ्यांवर नुकसान झाले. जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पूर बाधित शेतीच्या नुकसानाची प्रशासनाकडून पंचनामे आता युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून हे पंचनामे सुरू आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार 40 हेक्टर शेतीबाधित
27 जुलै रोजी अखेर प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा काठी असणारया शिराळा, वाळवा ,पलूस आणि मिरज तालुक्यातील सुमारे 247 गावातील 97 हजार 485 शेतकरयांची 40 हजार हेक्टरहुन अधिक शेतीबाधित झाली आहे. यामध्ये मुख्यतः ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या बरोबर भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे.जवळपास 50 कोटी इतका नुकसानीची आकडा असल्याचे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
तर, अद्याप अनेक गावात पुराचे पाणी आहे. अनेक गावात पंचनामे सुरूच आहेत. पूर ओसरल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून 2019 मधील महापुराच्या पेक्षा यावेळी शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाल्याचे कृषी अधीक्षक बस्वराज मास्तोळी यांनी सांगितले आहे.मिरज तालुक्यातील मौजे डिग्रजला ही पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला होता. त्यामुळे गावात घराच्या वर पाणी गेले होते. तर त्यामुळे येथील शेती पूर्णतः हा पाण्याखाली गेली होती. तर काही ठिकाणी ऊस शेती अक्षरश: जमीनदोस्त झाली आहे.
Published on: 30 July 2021, 03:21 IST