मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सगळ्या नद्या ओसंडून वाहत असल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले तसेच पाझर तलाव फुटले आहेत.त्यामुळे हे पाणी शेतामध्ये सोडल्यामुळे शेतातील सगळे पिके आडवी झाली आणि बळीराजा संकटात सापडला आहे.
या पुरामुळे अनेक लोकांच्या डोक्यावरचे छप्पर नाहीसे झाले.त्यामुळे अगणित असे नुकसान मराठवाड्यातील अतिवृष्टीने केले. आता या सगळ्या परिस्थितीचे कारणे कोणती याचा शोध घेतला जात आहे. आता या पार्श्वभूमीवर पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी त्याप्रसंगी चे कारणे शोधताना जलयुक्त शिवार योजना याला कारणीभूत असला कडे बोट दाखवले आहे.त्यामुळेविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा असलेली योजना जलयुक्त शिवार तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
अतुल देऊळगावकर यांनी असा दावा केला की जलयुक्त शिवार यांच्या कामाच्या वेळी नद्यांची छेडछाड करण्यात आली तसेच नद्यांचे रुंदीकरण, सरळीकरण करण्यात आले. त्यांच्या मते हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याकडे कुठलीच गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जात नाही. सर्व प्रकारची कामे हे गुत्तेदारांच्या आणि बिल्डरच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केले जात आहे. त्यामुळे कुठली गोष्ट त्यांना न विचारता केली जात आहे ही त्याची परिणती आहे असेही ते म्हणाले.
जलयुक्त शिवार यांच्या कामाची चौकशी अशी मागणी देखील देवगावकर यांनी केली आहे.ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीपपुरंदरे यांनी देखील देऊळगावकर यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. पुरंदरे म्हणाले की मराठवाड्यातील पुन्हा जलयुक्त शिवार योजना पुर आला असे आपण म्हणू शकत नाही. मात्र जलयुक्त शिवार योजना ही एक कारण आहे. या योजनेची सगळी कामे चुकीच्या पद्धतीने झाले आहेत.
Published on: 01 October 2021, 10:16 IST