कोरोना व्हायसरमुळे देशातील उद्योगधंद्यांवर पक्षाघात आला आहे. शेती व्यवसायही त्यातून सुटलेला नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला असून यात शेतकऱी वर्गाला आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. आता खरीप हंगाम येत असल्याने शेतकऱ्यांना पुढील उत्पन्नाची चिंता सतावत आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेने खरिपासाठी नाबार्डला २५ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ५०० कोटी रुपये आले आहेत.
दरम्यान खरीपाकरीता वेळेत कर्ज मिळाविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने ५०० कोटीचे कर्ज निधी देण्याचा निर्णय शिखर बँकेने घेतला आहे. जिल्हा बँकांनी गेल्या खरीपात शिखरक बँकेकडून सहा हजार कोटीचे कर्ज घेतले होते. यंदा देखील आम्ही भरपूर तरतुद केली आहे. बँकांचे प्रस्ताव येताच कर्ज वाटप केले जाईल. त्यासाठी आम्ही नाबार्डकडून धोरणानुसार पहिल्या टप्प्यातील ५०० कोटीचा निधी आम्ही जिल्हा बँकांकडे दोन दिवसाता वर्ग करणार आहोत, अशी माहिती शिखर बँकेच्या सुत्रांनी दिली. लॉकडाऊनमुळे कृषी पत पुरवठा व्यवस्थेला फटका बसला आहे. यामुळे कृषी पत पुरवठ्याला आधार देण्याची घोषणा
ठी रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानुसार सहकारी व ग्रामीण बँका तसेच सुक्ष्म आर्थिक पुरवठा संस्थांना २५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. नाबार्डच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप सुलभ होण्यासाठी देशातील विविध सहकारी बँकांना पुनर्वित्त निधी वाटण्यासाठी ही लगबग सुरू आहे. हा कर्ज निधी ४.८ टक्के व्याजदराने बँकांना मिळणार आहे.
Published on: 09 May 2020, 04:10 IST