News

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले, परंतु या लॉकडाऊनच्या काळात देसाची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली. पण कृषी क्षेत्रामुळे अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. तर दुसरीकडे रोजगार देणारे MSME सेक्टर पासून मोठी आशा देशाला आहे.

Updated on 17 August, 2020 5:08 PM IST


देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले, परंतु या लॉकडाऊनच्या काळात देसाची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली. पण कृषी क्षेत्रामुळे  अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. तर दुसरीकडे  रोजगार देणारे  MSME सेक्टर पासून मोठी आशा देशाला आहे. यातून ५ कोटी नोकऱ्या तयार होतील, असा दावा रस्ते, वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केला आहे. स्वावलंबन ई-समिट २०२० च्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

आपल्या देशाच्या विकासासाठी MSME सेक्टरचं मोठं योगदान आहे. जीडीपीमध्ये  ३० उत्पन्न हे MSME सेक्टरमधून येते. देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमधून  ४८ टक्के निर्यात ही MSME सेक्टर मधून होते.  पुढील पाच वर्षात  ग्रोथ रेट ५० टक्के, तर निर्यात  ४८ टक्क्यांवरुन ६० टक्के करणे आणि नव्या ५ कोटी नोकऱ्या तयार होतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

एमएसएमईचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी नसलेल्या उद्योगांना सूक्ष्म उद्योगांतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.  छोटे व्यापाऱ्यांचाही यात समावेश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा व्यापाऱ्यांनी नोंदणी करावी यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.  असंघटित व्यापाऱ्यांना यात समविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान कोरोना सारख्या संकटात देण्यात आलेले २० लाख कोटी रुपयांचे राहत पॅकेजमधून  एमएसएमई सेक्टरला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. या पॅकेजच्या माध्यमातून  ३ लाख कोटी रुपयांचे कर्जाची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे ४५ लाख एमएसएमईला लाभ होणार आहे. दरम्यान अर्थमंत्र्यांच्या मते,  १२ कोटीपेक्षा अधिक लोकांना रोजगार एमएसएमईमार्फत मिळतो.

English Summary: five crore jobs will be created through MSME sector
Published on: 17 August 2020, 05:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)