News

कोरोनाच्या संकटामुळे नोकरदार वर्गाला आपल्या नोकरीविषयी चिंता सतावत आहे. काही मजूरांचे हातातील काम गेले आहेत. यामुळे अनेकांपुढे भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा युवकांसाठी आम्ही काही व्यवसायाच्या आयडिया घेऊ आलो आहोत.

Updated on 21 May, 2020 4:34 PM IST


कोरोनाच्या संकटामुळे नोकरदार वर्गाला आपल्या नोकरीविषयी चिंता सतावत आहे. काही मजूरांचे हातातील काम गेले आहेत. यामुळे अनेकांपुढे भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा युवकांसाठी आम्ही काही व्यवसायाच्या आयडिया घेऊ आलो आहोत. याशिवाय तुम्ही शेती करत आहात आणि त्यासह आपल्याला अजून काही व्यवसाय करायचा आहे, त्याचा विचार करत आहात तर या लेखात तुम्हाला  पाच व्यवसायांची माहिती मिळेल. या कल्पनांमधून तुम्ही कोणता व्यवसाय करायचा हे ठरवू शकता.  हे व्यावसाय आपल्याला फार साधारण वाटतील पण यातून मिळणारा नफा मोठा असतो.

(Poultry farming Business) कुक्कुटपालन

कुक्कुटपालन हा व्यवसाय फार मोठा नफा देणारा आहे. शेतीसह हा व्यवसाय केल्यास आपले आर्थिक उत्पन्न नक्कीच दुप्पट होते. आपण आपल्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना हा व्यवसाय करताना पाहिले असेल. फक्त आपण पोल्ट्री मांस विक्रीसाठी करणार आहात का अंड्यासाठी प्रकल्प टाकणार आहात हे आधी ठरवावे. हा व्यवसाय सुरू करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी. कोंबडींचे पिल्ले कोणत्या कंपनीकडून घेणार आहात. कंपनीविषयीची व्यवस्थित माहिती घेऊन करार करावा. कमी प्रमाणातही हा व्यवसाय आपण चालू करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची गरज असते. जर आपण आवश्यक रकमेची तरतूद करू शकलात तर आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करू शकता.

(Ice-cream making Business)आईसक्रिम बनविण्याचा व्यवसाय - हा व्यवसाय चांगला उत्पन्न देणारा आहे, पण हंगामी व्यवसाय असल्याने याकडे सहसा कोणी वळत नाही. परंतु या व्यवसायासाठी आपल्याला बँकांकडून कर्जेही मिळते.

 


(Janaushadhi Kendra)जन औषधी केंद्र - यासाठी आपल्याकडे १३० चौ. फूट जागा किंवा गाळा हवा. आपल्या गाळा असल्यास आपण दुकान उघडून त्यात जन औषधी केंद्र सुरू करु शकता. यासाठी साधरण २ ते ३ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. सरकारी योजनेचा लाभ घेऊन आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.

 


(Popcorn making Business)पॉपकॉर्न  लाह्या बनविण्याचा व्यवसाय - जर आपल्याला कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्यवसाय त्यासाठी योग्य पर्याय आहे. यासाठी आपल्याला मका हवा आणि व्यवस्थित पॅकिग करता येणारे मशीनची आवश्यकता असते.

(Gardening Business) बागदार - नर्सरीचा व्यवसाय

जर आपण नैसर्गप्रेमी आहात तर आपल्यालासाठी एक व्यवसायची एक कल्पना आहे. हा व्यवसाय आहे, नर्सरीचा.  यात आपण अनेक प्रकारचे झाडे, फुलांची झाडे लावून त्यांना मोठे करून त्यापासून पैसा कमावू शकता. नर्सरी बरोबर आपण फुलांचा व्यवसायही करु शकता.

English Summary: five business ideas give more benefits on low investment
Published on: 21 May 2020, 04:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)