News

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात आले आहे. मागच्या हंगामात सोयाबीन लाख 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळाल्याने गदगद झालेल्या शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन लागवडीला मोठी पसंती दर्शवली आहे. परिणामी जिल्ह्यात मक्‍याचे क्षेत्र लक्षणीय कमी झाले आणि सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले. सुरुवातीला सोयाबीनला चांगले बाजार भाव प्राप्त होते मात्र मध्यंतरी केंद्रशासनाच्या सोयाबीन आयातीच्या मंजुरीमुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. जिल्ह्यात तर भाव पाच हजार रुपयांपर्यंत लुडकले होते, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा साहसी निर्णय घेतला आणि सोयाबीनची साठवणूक करण्यास सुरवात केली.

Updated on 27 January, 2022 10:40 AM IST

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या अचूक निर्णयामुळे बाजारपेठेत सोयाबीनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आणि सोयाबीनचे दर सात हजारांच्या घरात पोहोचलेत, जिल्ह्यात सोयाबीनला 6500 रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव प्राप्त झाला. मात्र हा भाव जास्त काळ टिकू शकला नाही, आणि आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असता सोयाबीनच्या भावाला पुन्हा एकदा उतरती कळा लागली असल्याचे चित्र जिल्ह्यात नजरेस पडत आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल एवढाच बाजार भाव सोयाबीन ला प्राप्त होत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीन विक्री करण्याऐवजी सोयाबीनच्या साठवणुकीवर विशेष भर दिला आहे. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे, जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

यावर्षी सोयाबीनच्या किमतीत नेहमी चढ-उतार नजरेस पडला आहे. केंद्र सरकारच्या सोयापेंड आयातिच्या निर्णयामुळे सोयाबीनच्या भावात लक्षणीय घट झाली होती. आणि आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील मोठी घट बघायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे बाजार भाव वाढतील की नाही याचा अंदाज बांधणे हे खूप कठीण काम असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीनच्या भावात आता फक्त तुटपुंजी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र सोयाबीन 7000 वर जातील याची शक्यता कमी आहे तसेच त्याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही.

सोयाबीनचे बाजार भावात अचानक झालेली घसरण सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा मळ्यातच सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका देऊन गेली आहे. जिल्ह्यातील अनेक सोयाबीन खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना सोयाबीनचे भाव सात हजार जातील अशी मनोमन आशा होती, त्या अनुषंगाने अनेक खरेदीदारांनी सोयाबीनची 6 हजार 100 ते 6 हजार 500 पर्यंत खरेदी करून ठेवली होती. पण या हंगामात सोयाबीनच्या व्यापाऱ्यांचे देखील गणित चुकवुन ठेवले आणि सोयाबीनच्या भावात आता अंतिम टप्प्यात मोठी घसरण झाली आणि सोयाबीनचे भाव जिल्ह्यांतर्गत पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत येऊन ठेपले आहेत. जिल्ह्यातील आडत व्यापाऱ्यांच्या मते, त्यांना किंटल मांगे सुमारे पाचशे ते सातशे रुपयांपर्यंतचा फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगितले जातं आहे.

English Summary: Five and a half thousand rupees per quintal soybeans in this district! Soybean growers confused
Published on: 27 January 2022, 10:40 IST