News

राज्यमंत्री चौधरी जेव्हा कृषी जागरण कार्यालय परिसरात पोहचले तेव्हा त्यांचं लक्ष ऑफीस बहुतालच्या हिरव्यागार झाडांनी वेधून घेतले. तसंच कार्यालयात असलेली झाडे पाहून देखील त्यांना आनंद झाला. यावेळी कार्यालयातील झाडे पाहून त्यांनी कृषी जागरणचे संस्थापक एम.सी. डॉमिनिक यांचे कौतुक केले.

Updated on 02 October, 2023 1:28 PM IST

New Delhi : पश्चिम बंगालचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री बिप्लब रॉय चौधरी यांनी कृषी जागरणच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कृषी जागरणच्या चौपाल कार्यक्रमात सहभाग घेतला. तसंच उपस्थित कृषी जागरणच्या टीम सोबत त्यांनी गप्पा मारल्या.

राज्यमंत्री चौधरी जेव्हा कृषी जागरण कार्यालय परिसरात पोहचले तेव्हा त्यांचं लक्ष ऑफीस बहुतालच्या हिरव्यागार झाडांनी वेधून घेतले. तसंच कार्यालयात असलेली झाडे पाहून देखील त्यांना आनंद झाला. यावेळी कार्यालयातील झाडे पाहून त्यांनी कृषी जागरणचे संस्थापक एम.सी. डॉमिनिक यांचे कौतुक केले.

केजे चौपाल येथे झालेल्या चर्चेदरम्यान चौधरी म्हणाले, "आजकाल झाडांची संख्या कमी आणि उच्च तापमानामुळे एसीशिवाय झोपणे कठीण आहे. जगभरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, झाडांची संख्याही कमी होत आहे." संख्या त्याच्याशी जुळत नाही. त्यामुळे, ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्यावर परिणाम होत आहे."

पुढे ते म्हणाले की, बिप्लब रॉय चौधरी हे मत्स्यमंत्री असूनही ते मासे खात नसल्याची त्यांनी माहिती दिली. पण त्यांना मत्स्य क्षेत्राबाबत संपूर्ण माहिती आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते शाकाहारी आहेत. तसंच चौधरी यांचा मत्स्य आणि शेती क्षेत्रात चांगला अभ्यास आहे. यामुळे त्यांना पिके आणि मासे यांची गुणवत्ता सहज ओळखता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या योग्य पद्धती जाणून घेऊन त्या अंमलात आणण्याची गरज आहे.

MFOI कार्यक्रमाबाबत ऐकून चौधरी यांना आनंद
कृषी जागरणच्या वतीने डिसेंबर महिन्यात मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून देशभरातील विविध शेतकऱ्याचा सन्मान करण्यात येणार आहे. याबाबत चौधरी यांना माहिती देण्यात आली. त्याबाबत ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. तसंच ते म्हणाले, देशात सर्वत्र विविध लोकांचे सन्मान केले जातात पण शेतकऱ्यांचा सन्मान केला जात नाही. आणि तो तुम्ही करत आहात. ही चांगली बाब आहे.

English Summary: Fisheries Minister Biplab Roy Chowdhury visit to Krishi jagran office kj chaupal update
Published on: 02 October 2023, 01:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)