निसर्गात कधी काय होईल कधी कोणाला सांगता येत नाही. आता आभाळातून माशांचा पाऊस पडणं हे त्यापैकीच एक. ऑस्ट्रेलियाच्या लाजमानुमध्ये मंगळवारी अचानक माशांचा पाऊस पडला. आकाशातून मासे कोसळू लागले. यामुळे याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे जिथे पाहावं तिथे मासेच मासे दिसत होते. रस्त्यांवर माशांचा खच पडला होता. अनेक लहानग्यांनी मासे गोळा केले आणि ते काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवले. तसेच मोठे मासे काहींनी पडकून खायला नेले.
दरम्यान, लाजमानुमध्ये गेल्या ३० वर्षांत किमान चारवेळा अशा प्रकारे माशांचा पाऊस पडला आहे. लाजमानुमध्ये माशांचा अखेरचा पाऊस मार्च २०१० मध्ये पडला होता. शहराला एका मोठ्या वादळाचा तडाखा बसला.
नरसू नाईक काळाच्या पडद्याआड, राजू शेट्टी यांचा सहकारी गेला, शेट्टींनी व्यक्त केले दुःख
वादळानंतर मोठा पाऊस पडेल, असं स्थानिकांना वाटत होतं. मात्र वादळानंतरचं दृश्य पाहून सगळेच चकित झाले. थोड्या वेळात आभाळातून शेकडो मासे पडू लागले. ते बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
100 हून अधिक गायींना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालणार, धक्कादायक बातमी आली समोर..
दरम्यान, शक्तिशाली वादळं पाण्यासोबत मासेही स्वत:कडे खेचून घेतात. त्यानंतर हेच मासे पावसासोबत शेकडो किलोमीटर दूरवर कोसळतात, असं हवामानतज्ज्ञ सांगतात. आपल्याकडे देखील काही ठिकाणी मासे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आपला ऊस राहतोय की काय? भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच, तोडणीला एकरी १० हजारांचा दर
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार?
ब्रेकिंग! तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित..
Published on: 27 February 2023, 11:10 IST