News

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये औद्योगिक विकास समूह अर्थात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले आहे.

Updated on 12 March, 2022 9:39 AM IST

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये औद्योगिक विकास समूह अर्थात ट्रायबल  इंडस्ट्रियल क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले आहे.

दिंडोरी तालुका हा मुख्य बाजार पेठेपासून जवळ आणि इतर आदिवासी तालुक्यांचा मध्यवर्ती ठिकाणी आहे एवढेच नाही तर रस्त्याने पाण्याची उपलब्धता देखील चांगली असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून या प्रयत्नांना यश आले आहे. या क्लस्टर ची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली.

 या ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरचे असे होतील फायदे……

 या परिसरात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, टोमॅटो तसेच भात,नागली, खुरसानी व वरईसारखी पिके मोठ्या प्रमाणात पिकवली जातात.यावर विविध प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची उभारणी करणे शक्य होणार आहे.

या तालुक्यांमध्ये उद्योगांसाठी पोषक वातावरण असून तसेच नाशिक शहरापासून तेवीस किमी अंतरावर असलेले पेठ, गुजरात राज्य मार्गावरील जांबुटके शिवारात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून  आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने उद्योजकांसाठी तयार शेडचे वितरण करणे, कृषी प्रक्रिया, इंजीनियरिंग, आदिवासी हस्तकला, लॉजिस्टिक आणि कौशल्य विकास तसेच गाळे या स्वरुपात शेडचे बांधकाम करण्यात येईल. 

त्यासोबतच तांत्रिक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे तसेच शेती प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमालाची स्वच्छता  त्यासोबतच वर्गीकरण आणि पॅकिंग सुविधा, शेतमालाच्या निर्यातीस चालना देण्यासाठी ट्रेनिंग आणि वर्कशॉप युनिटची देखील उभारणी करण्यात येणार आहे. सोबत असल्या समुहामुळे आजूबाजूच्या परिसरात रोजगाराची निर्मिती होऊन विकासाला चालना मिळणार आहे.

English Summary: first tribal idustrial clister establish in dindori in nashik district
Published on: 12 March 2022, 09:39 IST