दरवर्षी संपूर्ण देशातून विविध स्टील प्लांट मधून 19 मिलियन टन स्टील चा कचरा निघतो. या स्टील कचऱ्याचे मोठे मोठे ढीग स्टील प्लांट मध्ये पडलेले असतात. परंतु आता या स्टीलच्या कचर्यापासून रस्ते तयार केले जातील.
स्टील रोड बनवून तयार
बर्याच वर्षाच्या संशोधनानंतर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या शास्त्रज्ञांनी स्टीलच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आणि त्यानंतर गिट्टी तयार केली गेली व या गिट्टीचा उपयोग करून गुजरात मध्ये एक किलोमिटर लांबीचा सहा लेन असलेला रस्ता तयार केला गेला आहे. आता यापुढे देशात नवीन बनणारे महामार्ग हे स्टीलच्या कचऱ्यापासून बनवले जातील.
नक्की वाचा:पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला केंद्र सरकारची मुदतवाढ, आणखी 6 महिने मिळणार मोफत धान्य
जर आपण या अगोदरची परिस्थिती पाहिली तर गुजरातमधील हाजिरा पोर्ट वर अवजड ट्रक चालल्यामुळे रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब होती. परंतु आता या अनोख्या प्रयोगामुळे रस्ते हे पूर्णपणे स्टीलच्याकचरा पासून बनवले गेले आहेत. यावरून दररोज एक हजार पेक्षा जास्त ट्रक कमीत कमी 18 ते 30 टन वजन घेऊन या रस्त्यावरून जातात परंतु रस्त्यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही.
स्टीलच्या कचऱ्या पासून बनणाऱ्या रस्त्यांचे जाडी तीस टक्के कमी
या प्रयोगानंतर आता देशातील सगळे महामार्ग आणि रस्ते स्टील कचऱ्याचा वापर करून तयार केले जातील. कारण या पासून तयार होणारे रस्ते हे खूपच मजबूत असूनरस्ते तयार करण्याचा खर्च इतर रस्त्यांच्या तुलनेत 30 टक्के कमी आहे. सी आर आर आय च्या म्हणण्यानुसार या रस्त्यांची जाडी देखील इतर रस्त्यांच्या तुलनेत 30 टक्के कमी आहे.
देशातील विविध स्टील प्लांटमधून वर्षाला एकोणवीस मिलियन टन कचरा बाहेर पडतो.2030 पर्यंत हे प्रमाण 50 मिलियन टन पर्यंत पोचू शकते.
याचा विपरीत परिणाम हा पर्यावरणावर देखील पडू शकतो. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी निती आयोगने सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटला या प्रोजेक्टचे काम दिले होते. त्यानंतर बरेच वर्ष संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी सुरतच्या AMNS स्टील प्लांट मधून निघाणाऱ्या स्टीलच्या कचऱ्यावर प्रक्रिया करूनहे अवघड काम साध्य केले.
Published on: 27 March 2022, 11:16 IST