News

राज्यातील शेतकऱ्यांचे सध्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती संबंधित सर्वच खते देखील महाग झाली आहेत. यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

Updated on 24 January, 2022 12:59 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांचे सध्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती संबंधित सर्वच खते देखील महाग झाली आहेत. यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. यामध्ये सूट मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मोदी सरकारने रद्द केलेले कृषी कायदे, अवकाळी पाऊस, खतांच्या किमती यावरून हा अर्थसंकल्प गाजणार आहे. कृषी क्षेत्रावर सध्या अनेक मोठी संकटे आहेत. यासाठी यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रावर मोठी तरतूद करण्याची गरज अनेकांनी बोलून दाखवली आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आधार देण्याची गरज आहे. देशातील 90 टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे. शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नामुळे घरगाडा हाकणे कठीण झाले आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काय योजना सरकार आखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर अल्पभूधारक आहेत. ते सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत.

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सरकार कात्री लावणार की अर्थसहाय्याचे पॅकेज घोषित करणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कोरोना काळात कृषी आणि आरोग्य या दोनच क्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली होती. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना हाती घेतली. त्यामुळे वर्ष 2019-20 साठी कृषी क्षेत्रासाठी बजेटमध्ये भर घालून 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत करण्यात आले. यामध्ये शेकऱ्यांना मदत केली जाते. यामुळे सरकारवर याचा मोठा ताण पडला आहे. यामध्ये आता वाढ करण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच सध्या खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतीचे आर्थिक गणित विस्कटले आहे. यामध्ये देखील कपात करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या एकाच महिन्यात अनेक खतांच्या किमती तब्ब्ल दुप्पट वाढल्या आहेत. यामुळे यामध्ये दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांना काय दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शेतकरी याकडे आता लक्ष देऊन आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या देखील केल्या आहेत.

English Summary: Find out what farmers in Maharashtra expect from the central budget. (1)
Published on: 24 January 2022, 12:59 IST