News

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या जगात थैमान मांडले आहे जे की बाजारपेठा बंद पडल्या शिवाय शेतातील शेतमाल हा शेतातच पडून राहिला. बाजारपेठाच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा माल तसाच नासुन गेला तर काहींनी कांदा रस्त्यावर फेकून दिला. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे मात्र यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊसाने फक्त फळबागांचे तसेच इतर पिकांचेच नुकसान केले नाही तर नगदी पिकातील कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षीच्या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र पाणी काढले आहे.

Updated on 03 January, 2022 11:40 PM IST

कांद्याची लागवड तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली मात्र निसर्गाच्या अनियमित लहरीपणामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागात शेतकऱ्यांनी अशा ठिकाणी कांद्याची लागवड केली होती जे की त्या ठिकाणी पाऊसाची पाणी साचते. काही शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कांद्याची लागवड करावी लागली होती. सध्या बाजारात कांदा दाखल झाला असून प्रत्येक मार्केट समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कांद्याची आवक झालेली आहे जे की त्यास दरही चांगल्या प्रमाणत भेटले आहेत. अगदी अवकालीमुळे कांदा गेला जरी असला तरी बाजारात कांद्याची आवक चांगल्या प्रमाणत झालेली आहे.

आजचे कांद्याचे दर :-

आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक १२४६५ क्विंटल झाली आहे. लाल कांद्याला किमान ८०० रुपये भाव मिळाला आहे तर कमाल भाव २३९१ रुपये भाव मिळाला आहे. लासलगाव मधील बाजार समितीत लाल कांद्याला सर्वसाधारण भाव १८५० रुपये मिळाला आहे. तसेच येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक ११ हजार क्विंटल झाली होती त्यामध्ये लाल कांद्याला किमान ४०० रुपये भाव तर किमान २१५३ रुपये भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण कांद्याला भाव १६०० रुपये भेटला आहे.

पुणे बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची आवक १४४१९ क्विंटल झाली आहे त्यामध्ये लाल कांद्याला किमान ५०० रुपये भाव मिळाला आहे तर ३४०० रुपये कमाल भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण लाल कांद्याला १६५० रुपये भाव मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत लाल कांद्याची आवक ६५०० क्विंटल झाली आहे जे की लाल कांद्यास किमान ५०० रुपये दर मिळाला आहे तर २११३ कमाल दर मिळाला आहे. सर्वसाधारण या कांद्याला १८०० रुपये दर मिळाला आहे.

English Summary: Find out today's onion prices in the market committee
Published on: 03 January 2022, 11:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)