News

यावर्षी कारखान्यांचा गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात आला असला तरीसुद्धा बराच ऊस अजून देखील शेतांमध्ये उभा आहे. गेल्या अठरा महिन्यापासून ऊसाला जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिवाचे रान केले आहे.

Updated on 22 March, 2022 11:06 AM IST

यावर्षी कारखान्यांचा गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात आला असला तरीसुद्धा बराच ऊस अजून देखील शेतांमध्ये उभा आहे. गेल्या अठरा महिन्यापासून ऊसाला जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिवाचे रान केले आहे.

परंतु अजूनही बऱ्याच उसाची तोड होत नसल्याने आज तोडयेईल,उद्या तोड येईल या आशेवर शेतकरीअजूनही मोठ्या कष्टाने उस जगवत आहे.त्यातच उसाचा कालावधी जास्त झाल्याने उसाला तुरे येऊनत्याच्या वजनात घट होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे गाळप होणे फार महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:बँक खात्यात झिरो बॅलन्स! पी एम किसानच्या अपात्र लाभार्थी कडून कशी होईल वसुली? मोठा पेच

 शेतात उभा असलेला ऊस गाळपासाठी कारखान्याकडे जावा यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत आहेत. ऊसाला तोडणी लवकर यावी यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू असून याच परिस्थितीचा फायदा काहीजण घेताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे ऊसतोडीसाठीशेतात टोळी पाठवण्यासाठी देखील पैशांची मागणी करण्यात येत आहे. ऊस तोडण्यासाठी एकरी सात ते दहा हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. एवढेच नाही तर ट्रक आणि ट्रॅक्टर चालक देखील प्रत्येक फेरीला पाचशे ते 1हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत.

त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून दुहेरी संकटात सापडला आहे.फेब्रुवारी महिन्यापासून उसाची तोडणी येण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेलीधडपड पाहून त्यांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. यामध्ये कारखान्यांच्या चिटबॉयला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

नक्की वाचा:शिष्टमंडळाची शरद पवारांना भेट: कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी शरद पवारांना घातले साकडे

सोलापूर जिल्ह्यातील उसाची परिस्थिती

 यावर्षी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे पाण्याची उपलब्धता देखील चांगली असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीला प्राधान्य दिले. परंतु जीवापाड जपलेला हा ऊस अजूनही शेतात उभा असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम ऑक्टोबर व नोव्हेंबर च्या दरम्यान  सुरु झाला व चार महिन्यांमध्ये माढा तालुक्यातील खाजगी व सहकारी साखर कारखाने मिळून 23 ते 24 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. 

परंतु अजूनही या परिसरात आठ ते दहा लाख मेट्रिक टन ऊस असाच उभा आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे ऊस लागवड क्षेत्रात झालेली वाढ व कारखान्यांनी कार्य क्षेत्राबाहेरील उसाला दिलेले प्राधान्य हेच म्हणता येईल. त्यामुळे एकीकडे शेतात उभा असलेला ऊस, त्याचे घटत चाललेले वजन आणि उभा असलेल्या उसाला तोडण्यासाठी करण्यात येणाऱ्या पैशांची मागणी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

English Summary: financial demand from farmer for cane crop cutting so farmer so anxiety
Published on: 22 March 2022, 11:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)