संत्रा अन् पपई उत्पादकांवर आर्थिक संकट; पपईला ६ रुपयांचा भाव

14 December 2020 11:11 AM By: भरत भास्कर जाधव


केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी घातक आहेत, अशी बतावणी केली जात आहे.पण सध्या असलेल्या कायद्यांमुळेही शेतकरी खूश नाहीत. कारण जळगावमधील पपई उत्पादक आणि नागपूर मधील संत्रा उत्पादकांची स्थिती पाहता आपल्याला लक्षात येत आहे. जळगावमधील जागेवर किंवा शिवार खरेदी ही फक्त ५ ते ६ रुपयांमध्ये होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना जागेवर किमान ७ ते ८ रुपये प्रतिकिलोचा दर हवा आहे. खरेदीदार मनमानी करीत आहेत.थंडीचे प्रमाण कमी आहे, उत्तरेकडे पपई विकली जाते.पण कोरोना आणि इतर संकटांची कारणे सांगून उठाव नसल्याची बतावणी खरेदीदार करीत आहेत.

हेही वाचा: शेतकरी महिलेची किमया- तीस गुंठ्यात घेतले पाच लाखाचे उत्पन्न

दिल्ली,राजस्थान, मध्य प्रदेश व धुळे परिसरातील व्यापारी किंवा खरेदीदार पपईची खरेदी करतात.नंदुरबारमध्ये शहादा,धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा येथील काही एजंट पपईच्या खरेदीसंबंधी परराज्यातील खरेदीदारांना मदत करतात. पपईचे दर सुरुवातीपासून कमी आहेत. नाशवंत असल्याने पपई उत्पादकांची खरेदीदारांनी कोंडी केली आहे.यंदा अतिपावसात पिकाची मोठी हानी झाली आहे. सुरुवातीला १८ रुपये प्रतिकिलोचे दर नंदुरबार,शिरपूर भागात जागेवरच शेतकऱ्यांना मिळत होते.परंतु नंतर १२ रुपये प्रतिकिलोचा दर ऑक्टोबरच्या अखरेस झाला.नोव्हेंबरमध्ये ९ ते ७ रुपये प्रतिकिलोचा दर झाला. शहादा तालुक्यात पपईची लागवड अधिक केली गेली आहे.

 


या तालुक्यात तब्बल ३८०० हेक्टरवर पपई आहे. पण खरेदीदार लॉबीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या खानदेशात पपईची रोज ८० ट्रक आवक होत आहे. आवक कमी होत आहे. नागपूरमध्येही संत्रा उत्पादकांची हीच स्थिती आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संत्र्याला १००० ते ३५०० रुपये क्विंटलचा दर होता, यंदा केवळ ७०० ते एक हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यातून तोडणी आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कळमना बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात मोठ्या आकाराच्या संत्रा फळाची सरासरी एक हजार क्किंटल आवक आणि दर २४०० ते ३ हजार रुपये क्किंटल होते.त्यानंतरच्या कालावधीत संत्रा दर ३५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

 

यावर्षी मात्र नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दर मिळविण्याचे आव्हान देखील निर्माण झाले आहे. या फळांची गळ होते तर कधी संत्रा झाडांचे  नुकसान होण्याची शक्यता असल्याने नाईलाजाने ही फळे काढावी लागतात.काढलेली फळे बाजारात नेल्यास तोडणी आणि वाहतूक खर्चाची भरपाई देखील शक्य होणार नाही याची शेतकऱयांना जाणीव आहे. त्यामुळेच अक्षरश: ही फळे रस्त्यावर फेकून दिली जात आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संत्र्यांची कळमाना बाजार समितीत पाच हजार क्विंटलची आवक नोंदविण्यात आली.दरम्यान डिसेंबर महिन्यात बागा ताणावर सोडल्या जातात. त्यानंतर दहा जानेवारीच्या पुढे  बागांना पाणी देतात. अशा प्रकारचे नियोजन पुढील हंगामात आंबिया बहर घेण्यासाठी केले जाते. परंतु सध्या संत्रा फळे झाडावर तशीच असल्याने हे नियोजन कोलमडण्याची भीती वर्तवली जात आहे. 

financial crisis orange papaya growers papaya price संत्रा पपई उत्पादक आर्थिक संकट जळगाव नागपूर
English Summary: Financial crisis on orange and papaya growers, papaya price at Rs 6

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.