News

मुंबई: वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी झाल्यास तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देताना यासंबंधीचा शासन निर्णय (दि. 28) निर्गमित झाल्याचे सांगितले.

Updated on 30 November, 2018 12:34 PM IST


मुंबई:
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी झाल्यास तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देताना यासंबंधीचा शासन निर्णय (दि. 28) निर्गमित झाल्याचे सांगितले.

ते म्हणाले, वरील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे अर्थसहाय्य वाढविण्यात येऊन आता ते 15 लाख इतके करण्यात आले आहे. तर गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भावाप्रमाणे असलेल्या किंमतीच्या 75 टक्के किंवा 60 हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल.

संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी 3 लाख रुपयांची रक्कम देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे दिली जाईल. उर्वरित 12 लाख रुपयांची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यात ठेव स्वरूपात जमा करण्यात येईल.

वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय रक्कम देण्यासाठी, पशुधनाच्या मृत्यूमुळे देण्यात येणारे अर्थसहाय्य देण्यासाठी पूर्वीचे नियम यापूर्वी होते तसेच लागू राहतील, असेही ते म्हणाले.

English Summary: Financial assistance of Rs. 15 lakhs for the human loss in wild animals attacks
Published on: 30 November 2018, 11:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)