News

नवी दिल्ली: 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अभिनव उपक्रम मंजूर करण्यात आला ज्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि प्राण्यांचे आरोग्य सुधारेल. पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल मुरुम रोग (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिस नियंत्रित करण्याशी संबंधित आहे. पुढील पाच वर्षांत पशुधनावर पडणाऱ्या या रोगांचे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी तसेच या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी मंत्रिमंडळाने एकूण 13,343 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Updated on 07 June, 2019 8:43 AM IST


नवी दिल्ली:
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अभिनव उपक्रम मंजूर करण्यात आला ज्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि प्राण्यांचे आरोग्य सुधारेल. पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल मुरुम रोग (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिस नियंत्रित करण्याशी संबंधित आहे. पुढील पाच वर्षांत पशुधनावर पडणाऱ्या या रोगांचे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी तसेच या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी मंत्रिमंडळाने एकूण 13,343 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पशुधन बाळगणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

जनावरांची काळजी आणि सहानुभूती:

एफएमडीच्या बाबतीत, या योजनेमध्ये बोवाइन वासरांना प्राथमिक लसीकरण तर सहा महिन्यांच्या अंतराने 30 कोटी बोवाइन (गायी-बैल आणि म्हशी) आणि 20 कोटी मेंढी व 1 कोटी डुकरांचे लसीकरण केले जाणार आहे. ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 3.6 कोटी गाई वासराचे 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारांच्या दरम्यान खर्च वाटून घेण्याच्या आधारावर हा कार्यक्रम लागू केला गेला आहे. मात्र आता या रोगांचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आणि देशातल्या सर्व पशुधनधारक शेतकऱ्यांना उपजीविकेची संधी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आता संपूर्ण खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे.

English Summary: Financial Assistance from Central Government for Livestock Diseases Eradication
Published on: 07 June 2019, 08:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)