News

मुरघास निर्मिती साठी आवश्यक सायलेस बेलर मशीन युनिट साठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 50% हिस्सा केंद्राच्या निधीतून रुपये 10 लाख रुपये योजना जाहीर करण्यात आली आहे.

Updated on 12 April, 2021 2:00 PM IST

मुरघास निर्मिती साठी आवश्यक सायलेस बेलर मशीन युनिट साठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 50% हिस्सा केंद्राच्या निधीतून रुपये 10 लाख रुपये योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी., संस्था, स्वयंसाहाय्यता बचत गट, गोशाळा, पांजरपोळ, संरक्षण संस्थांनी त्वरित अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बि. आर. नरवाडे यांनी केले आहे.

यावेळी डॉक्टर नरवाडे म्हणाले की,  या योजनेच्या माध्यमातूनसायलेज बेलर, हेवी ड्युटी कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली, वजन काटा, हार्वेस्टर मशीन व शेड हे घटक आहेत. जिल्ह्यासाठी एका संयंत्राचा लक्षांक देण्यात आला असून योजना सर्वसाधारण योजनेतील आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांना दिलासा देण्याच्या मार्गदर्शक सूचना यात आहे.

 

या योजनेचा लाभ महाडीबीटी द्वारे देण्यात येईल.या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे, मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे व संस्थेत नफा प्राप्त होणे आहे. 

प्रति युनिट 20 लाख रुपयांच्या खर्चापैकी दहा लाख संस्थेने भरावयाचे आहेत. असे डॉक्टर नरवाडे यांनी कळविले आहे.

English Summary: Financial assistance for fodder production machine
Published on: 27 March 2021, 04:33 IST