News

कोल्हापूर: महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आपल्या शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांची महात्मा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत कर्जमाफी केली. कर्जमाफी समवेतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून 50 हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्या वेळी महाविकास आघाडी सरकारने केली होती.

Updated on 08 May, 2022 2:02 PM IST

कोल्हापूर: महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आपल्या शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांची महात्मा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत कर्जमाफी केली. कर्जमाफी समवेतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून 50 हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्या वेळी महाविकास आघाडी सरकारने केली होती.

मात्र, मध्यंतरी कोरोनामुळे  राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला गेल्यामुळे प्रोत्साहनपर राशी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देता येणे शक्य नव्हते. प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा करून जवळपास आता दोन वर्षाहून अधिक काळ उजाडला असून अजूनही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी मिळालेली नाही.

मात्र, याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान राशींसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती येत्या बुधवारपर्यंत सहकार विभागाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे सांगितलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बिनडोकपणाचा कळस! अज्ञात इसमाने साठवलेल्या कांद्यावर टाकला युरिया; शेतकऱ्याचे हजारोचं नुकसान

Weather Frorecast : बंगालच्या उपसागरात वादळ; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम; वाचा

Small Business Idea 2022: कमी खर्चात सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला 10 लाख; विश्वास नाही बसत मग एकदा वाचाच

ऑगस्ट मध्ये 50 हजार फिक्स 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे काम कुठंपर्यंत आले तसेच पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची? याबाबत बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे राज्यातील विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांकडून आढावा घेणार आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की अजून पर्यंत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेबाबत कोणतीच स्पष्टता आलेली नाही; परंतु संगणक प्रणालीद्वारे माहिती भरणे, पात्र यादी आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी ऑगस्ट उजाडण्याची शक्यता असल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे 50 हजार रुपये शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यानंतरच मिळतील असे चित्र आता बघायला मिळत आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मित्रांनो माहितीसाठी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्या शेतकऱ्यांनी 2017-18; 2018-19; 2019-20 यापैकी दोन किंवा एक वर्ष पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली असेल त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून महाविकास आघाडी सरकार 50 हजार रुपयांची मदत देणार आहे.

अर्थात ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केलेली असेल त्यांनाचं या प्रोत्साहनपर राशीचा फायदा होणार आहे. मित्रांनो मात्र असे असले तरी, या तीन वर्षापैकी  एक वर्ष जरी थकीत असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. म्हणून वेळेवर कर्जाची परतफेड करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत याची नोंद संबंधित शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.

English Summary: ..Finally fixed! On this day farmers will get 50 thousand rupees
Published on: 08 May 2022, 02:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)