छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा राज्यातील राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्याने केलेल्या याचिका केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील भाऊसाहेब बजरंग पारखे आणि इतर शेतकऱ्यांनी मागील महिन्यात याचिका दाखल केली होती. ग्रीन लिस्टमध्ये नावे नसल्याने तसेच योजनेचे पोर्टल बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिले होते. जून 2017 मध्ये सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली.
जून 2016 मध्ये थकीत असलेले मुद्दल आणि त्यावरील व्याजासह दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि योजनेच्या अनुषंगाने लाभधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. ग्रीन लिस्टमध्ये नावे नसल्याने तसेच योजनेचे पोर्टल बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिले होते.
देशातील 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्र सुरू होणार, मोदींच्या हस्ते लोकार्पण..
दरम्यान, खिर्डी येथील भाऊसाहेब बजरंग पारखे आणि कांतीबाई हळनोर (मयत) तर्फे वारस साहेबराव हळनोर यांनी खिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेकडून पीक कर्ज आणि संकरित गायीच्या खरेदीसाठी कर्ज घेतले होते. असे असताना त्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. पारखे यांच्या जमिनीवर असलेल्या कर्ज बोजामुळे त्यांना नवीन कर्ज घेणे अडचणीचे झाले.
एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या, ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार
त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. असे असताना खंडपीठाने अशा सर्व शेतकऱ्यांना या निकालाच्या आधारे प्रकरणांची शहानिशा करून पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असा आदेश केला. आता या निर्णयामुळे 1800 कोटींची कर्जमाफी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
परतीच्या पावसाने सोयाबीनचे झाल नुकसान, 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने संपवल जीवन
एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या, ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार
बनावट खताची पोती बाजारात, शेतकऱ्यांचे होतय मोठं नुकसान..
Published on: 16 October 2022, 02:25 IST