उजनी धरणातील पाणी प्रश्नावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे सोलापूरचे पालकमंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. उजनीचे पाणी बारामती, इंदापूरला देण्याला जोरदार विरोध होताना दिसत आहे. यामुळे सोलापूरचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करण्यात आली.
यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उजनी धरणतील पाण्यावर दरोडा टाकला जात आहे. 'आज आरती केली आहे पण येणाऱ्या काळात भरणे मामांच्या नावाने शांती करणार' असल्याचा इशारा यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला.
या योजनेच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण 17 गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी अनेक दिवसांपासून मोठा संघर्ष सुरु आहे. भरणे हे इंदापूरचे आमदार असून सोलापूरचे पालकमंत्री आहेत. यामुळे आता ते कोंडीत सापडले आहेत.
असे असताना राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली, यामुळे प्रकरण चांगलेच तापले आहे. या योजनेसाठी 348 कोटी 11 लाख रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र या योजनेस मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि काही राजकीय लोकांनी विरोध केला आहे.
या योजनेत इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव परिसरातून साधारण 765 हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. यामुळे या गावांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. ही गावे यासाठी अनेक दिवसांपासून आग्रही आहेत. यामुळे येणाऱ्या काळात यासाठी अजूनच संघर्ष होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
लवकरचा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना
दुग्धव्यवसायासाठी डेअरी फार्मचे नियम आहेत फायदेशीर, जाणून घ्या...
शेतकऱ्यांनो शेतीत वापरले जाणारे प्लास्टिक मल्चिंग धोक्याचे, धक्कादायक माहिती आली समोर
Published on: 17 May 2022, 10:41 IST