News

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, महापूर, वातावरणात होणारा बदल यामुळे शेतकरी राजाचे लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी ठरलेलेच आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर अटळ आहे मात्र शेतकऱ्याच्या सोन्यासारखा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, शेतीविषयक शासनाचे धोरण, विज पंपाचा पुरवठा खंडित करणे, खत टंचाई व खतांची दरवाढ या सुलतानी दडपशाहीमुळे देखील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

Updated on 08 February, 2022 6:35 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, महापूर, वातावरणात होणारा बदल यामुळे शेतकरी राजाचे लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी ठरलेलेच आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर अटळ आहे मात्र शेतकऱ्याच्या सोन्यासारखा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, शेतीविषयक शासनाचे धोरण, विज पंपाचा पुरवठा खंडित करणे, खत टंचाई व खतांची दरवाढ या सुलतानी दडपशाहीमुळे देखील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

या अश्या सुलतानी आणि अस्मानी संकटांना तोंड देत बळीराजा कसा तरी आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतांना दिसत आहे. सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगाम जोरात सुरू आहे, रब्बी हंगामात देखील शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्येय आला आहे. निसर्गाच्या लहरीपणा समवेतच शेतकरी बांधवांना सध्या खत टंचाईचा व खत दरवाढीचा सामना करावा लागत आहे. भारत देश जगात कृषिप्रधान म्हणून मिरवत असतो मात्र याच कृषिप्रधान देशात, कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाचे अपरिमित हाल होताना बघायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नव्हे नव्हे तर संपूर्ण राज्यात सध्या खता टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. ऐन रब्बी हंगामाच्या पिकांच्या वाढीच्या वेळी खतांचा जाणवणारा तुटवडा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. 

खत टंचाई तर संपूर्ण राज्यात कायम आहे शिवाय वाढलेल्या खतांच्या किमती मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भरघोस वाढ नमूद करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांच्या किमतीत झालेली ही भरमसाठ वाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातही प्रकर्षाने खत टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या पुसा शिवारात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा आणि कांदा या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सध्या शिवारातील ही पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. आणि या पिकांना लवकरात लवकर खतांची मात्रा देणे अपरिहार्य ठरले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकवाढीच्या काळात निर्माण झालेली खत टंचाई व खतांचे वाढलेले अवाजवी दर यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे. 

परिसरात कांदा तसेच इतर रब्बी हंगामातील पिकांना आवश्‍यक असलेले खाद्य खत विक्रेत्यांकडे उपलब्धच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या खत विक्रेत्यांच्या दुकानात फेऱ्या माराव्या लागत आहेत. पिकांना वेळेत खतांची मात्रा दिली जात नसल्याने रब्बी हंगामातील पिकांची जोमदार होणारी वाढ आता जणू खुंटलीच आहे आणि याचा परिणाम सरळ उत्पादनावर होणार असल्याचे शेतकऱ्यांद्वारे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या मते, संयुक्त खतामध्ये जवळपास 200 ते 300 रुपये प्रति बॅग एवढी दरवाढ केली गेली आहे. मात्र दरवाढ झालेली असताना देखील ऐन हंगामात खतांची उपलब्धता नसल्यामुळे रब्बी हंगामाचे पिकांचे मोठे नुकसान होत असून या नुकसानीसाठी सर्वस्वी मायबाप सरकार जबाबदार असणार आहे. एकंदरीत नगर जिल्ह्यासारखीच परिस्थिती सर्व राज्यात बघायला मिळत आहे.

English Summary: fertilizer shortage and increased rate are seemed dangerous for farmer
Published on: 08 February 2022, 06:35 IST