News

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रशिया मधून भारत जवळपास बारा टक्के अर्थात 70 लाख टन डीएपी आयात करत असतो. मात्र, यंदा अद्यापही डीएपीची आयात होऊ शकली नाही. हे चित्र बघता आगामी खरीप हंगामात खतांची मोठी कमतरता भासणार असल्याचे समजत आहे.

Updated on 18 March, 2022 10:49 AM IST

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध पोटी जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा मोठा तुटवडा भासला असून देशातही खाद्यतेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. याबरोबरच इंधन दरवाढ देखील होणार असल्याचा तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.

एवढेच नाही या युद्धामुळे खतांच्या किमती देखील विक्रमी वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रशिया मधून भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात होत असते परंतु युद्धामुळे आयातीवर परिणाम होणार असून यामुळे खतांच्या किमती वाढतील.

महत्वाची बातमी:-मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी एक अनोखे गिफ्ट; मिळणार पाच लाखांचे अनुदान

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रशिया मधून भारत जवळपास बारा टक्के अर्थात 70 लाख टन डीएपी आयात करत असतो. मात्र, यंदा अद्यापही डीएपीची आयात होऊ शकली नाही. हे चित्र बघता आगामी खरीप हंगामात (Kharif Season) खतांची मोठी कमतरता भासणार असल्याचे (Fertilizer Shortage) समजत आहे.

या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपणास आवश्यक तेवढे खत आत्ताच खरेदी करून ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. याबरोबरच शेतकरी बांधवांना खतांचा अतिरेक वापर टाळण्याचा तसेच माती परीक्षण करून योग्य त्या खतांचा वापर करण्याचा आग्रह देखील यावेळी करण्यात आला आहे.

महत्वाची बातमी:-महत्वाची बातमी! कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार; उपमुख्यमंत्री अजित दादांनी केले स्पष्ट

सध्या राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यातही उन्हाळी पिके अंतिम टप्प्यात आहेत. साधारणता उन्हाळी पिकांची काढणे झाले की शेतकरी बांधव खरीप हंगामाची पूर्वमशागत तसेच खतांचा साठा करण्यासाठी लगबग करत असतो. एकीकडे शेतकरी बांधव शेतीची पूर्व मशागत करतो तर दुसरीकडे मे च्या सुमारास खतांसाठी देखील धडपडत असतो.

परंतु सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असल्याने भविष्यात खतांची टंचाई जाणवू शकते म्हणून ऐनवेळी खतांची उपलब्धता होने कदाचित शक्य असणार नाही म्हणून शेतकरी बांधवांनी आतापासून खतांचा साठा करून ठेवणे अनिवार्य आहे.

असे असले तरी शेतकरी बांधवांनी खतांचा अतिरेक वापर करू नये तसेच गरजेनुसार खतांचा साठा करावा हे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांकडे मुबलक खतांचा साठा उपलब्ध आहे परंतु युद्ध सुरू असल्याने यामध्ये मोठा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे  शेतकरी बांधवांनी गरजेनुसार खतांचा साठा करून ठेवावा.

महत्वाची बातमी:-आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजाराचे विनातारण कर्ज

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पिकांच्या गरजेनुसार खतांचे योग्य नियोजन करता यावे यासाठी शेतकरी बांधवांनी मातीपरीक्षण करून घ्यावी. माती परीक्षण केल्यानंतर पिकांना आवश्यक खतांची गरज ओळखून त्या खतांचा साठा करावा.

माती परीक्षण केल्याने खतांचा अतिरेक वापर टाळता येऊ शकतो तसेच यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च देखील वाचणार आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात 4 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते या पिकासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या खताची मोठी आवश्‍यकता असते.

नांदेड जिल्ह्यात या खताचा सध्या मुबलक प्रमाणात साठा आहे. असे असले तरी अजूनही रशियातून या खतांची आयात झालेली नाही त्यामुळे भविष्यात या खताची टंचाई जाणवू शकते म्हणून गरजेनुसार आत्ताच खतांचा साठा करणे अपरिहार्य राहणार आहे.

महत्वाची बातमी:-कृषी वैज्ञानिकांचा सल्ला! जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी उन्हाळी हंगामात 'या' पिकांची लागवड करा

English Summary: fertilizer rate will increase because of war so do this work now otherwise
Published on: 18 March 2022, 10:49 IST