पेरणीसाठी शेतकरी महागडी खते तसेच मशागतीला जास्त खर्च करतात मात्र शेत मालाला कसलाच दर नसल्याने शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.खरीप हंगामातील पिकांना सुद्धा यावेळी कसलाच भाव मिळालेला नाही असे असताना सुद्धा रब्बी ची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे मात्र रासायनिक खतांच्या किमती जोरात वाढलेल्या आहेत.एका बाजूने पाहायला गेले तर सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे म्हणून प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे असे हाल होत आहेत. रासायनिक खतांच्या किमती ५० ते ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत.
डी.ए.पी स्थिर मात्र मिश्र खतांच्या दरात वाढ:-
सरकारणे डाय अमोनियम फॉस्फेट ची किमंत आहे अशी १२०० रुपये वर स्थिर ठेवलेली आहेत मात्र पेरणी च्या वेळी मिश्र खते वापरली जातात त्यामध्ये ५० ते ५०० पर्यंत किमंत वाढवली जाते त्यामुळे 12:32:16 या मिश्र खताच्या ५० किलो च्या पोत्यासाठी शेतकऱ्यांना १७०० रुपये द्यावे लागतील जे यामध्ये ५०० रुपये वाढवण्यात आले.10:26:26 मिश्र खताच्या पोत्यासाठी ४०० रुपये तर 20:20:00 मिश्र खताच्या पोत्याची १५० रुपये ने वाढ करण्यात आलेली आहे. पालाश च्या गोणीची ५० रुपये ने वाढ तर युरिया ४५ रुपये किलो ने मिळत आहे.
लिंकिंगसाठी तगादा:-
जर शेतकऱ्यांना महाधन किंवा युरिया चे खत घ्यायचे असेल तर त्यासोबत दुय्यम अन्नद्रव्ये किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये असणारी रासायनिक खते घ्यावी लागणार नाहीतर दुसरी खते दिली जाणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना खते घ्यावीच लागतात. शेतकऱ्यांना अधिक पैसे देऊन खते घ्यावी लागत आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान तर व्यापारी वर्गाचा फायदा होत आहे.
कृषी विभागाचेही दुर्लक्ष:-
बाजारात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते, सेंद्रिय औषधे दाखल झालेली आहेत जे की प्रत्येक गावात एजंट नेमले आहेत. शेतकऱ्यांच्या गळ्यात ही खते घातलेली आहेत. सेंद्रिय खतांतील, औषधातील घटकांची गुणात्मक तपासणे हे कृषी विभागाचे काम आहे जे की त्यांनी यासाठी विशेष पथके नेमली आहेत पण ते यामध्ये दुर्लक्ष करत आहेत.
Published on: 24 October 2021, 06:08 IST