अगोदर शेतकरी नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झाले आहेत. यावर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो की आता रब्बी हंगामाच्या तोंडावर आलेल्या अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असतानाच कसा तरी रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नवीन संकट उभे राहिले आहे.
या खतांमध्ये पोट्याश सह अन्य रासायनिक खतांचा समावेश आहे.आता रब्बी हंगामातील पिकांना खते द्यायची वेळ असल्याने हा विषय समोर आला आहे. खताचे नवीन दर पाहिले तर तब्बल एक पन्नास किलोच्या गोणी मागे तीनशे ते साडेतीनशे रुपयाची वाढ झालेली आहे. या मध्ये संयुक्त खताच्या किमती वाढलेल्या आहेत.
वाढलेल्या खतांच्या जुन्या आणि नवीन किमती
1-10:26:26-जुनी किंमत अकराशे 75 रुपये, नवीन किंमत 1470 रुपये
2-12:32:16- जुनी किंमत एक हजार 185 रुपये, नवीन किंमत एक हजार 480 रुपये
3-24:24:00- जुने किंमत एक हजार 210 रुपये, नवीन किंमत आहे 1700 रुपये
4-15:15:15- जुने किंमत एक हजार 70 रुपये तर नवीन किंमत 1350 रुपये
पोटॅश च्या किमती वाढल्याने संयुक्त खताच्या किमतीमध्ये वाढ असल्याचे म्हटले जात आहे. तशी ही भाववाढ चार महिन्याच्या अगोदर झालेली आहे. मधल्या काळात खताचे भाव कमी झाले ते सध्या टिकून आहेत पण मागील वर्षीच्या तुलनेत सध्याचा दर दुप्पट आहे. पेरणीची वेळ असल्याने खतांची मात्रा देण्याच्या वेळेस भाववाढ हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.( संदर्भ- लोकमत)
Published on: 11 December 2021, 07:13 IST