News

दोनशे फूट खोल कूपनलिका घेतली तर त्याचे भूजल पुनर्भरण अधिक चांगले होते, असे अज्ञान असल्याने अधिक खोल बोर घेण्याची चाललेली स्पर्धा भविष्यात अडचणीची ठरेल. भूगर्भ कोरडे होऊ नये, याकरिता सामुहिक जागृतीची गरज आहे, असे मत सहज जलबोध अभियानचे प्रमुख व केंद्रीय भूजल मंडलचे वरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले.

Updated on 13 July, 2021 4:37 PM IST

नगर : दोनशे फूट खोल कूपनलिका घेतली तर त्याचे भूजल पुनर्भरण अधिक चांगले होते, असे अज्ञान असल्याने अधिक खोल बोर घेण्याची चाललेली स्पर्धा भविष्यात अडचणीची ठरेल. भूगर्भ कोरडे होऊ नये, याकरिता सामुहिक जागृतीची गरज आहे, असे मत सहज जलबोध अभियानचे प्रमुख व केंद्रीय भूजल मंडलचे वरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले.

भूजल नगरच्या सर्वेक्षण व विकास यंत्रणा व नेवासा तालुका पत्रकार एकता संघातर्फे ‘पाणी बचत काळाची गरज व जल साक्षरता’ या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा झाली. केंद्रीय भूजल मंडलाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी मार्गदर्शन केले. पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष सुनील गर्जे, जलमित्र सुखदेव फुलारी यांच्यासह पत्रकार व जलमित्र सहभागी झाले होते.

 

अनेक गावांतील पुरातन बारव व विहिरीवर अतिक्रमण होत आहे. गावांत कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीजवळ खासगी कूपनलिका घेता येते का? मागील वर्षी नेवासा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्ती पाऊस पडलेला असतानाही पावसाळ्यापूर्वी पाण्याची अडचण येते, ६० मीटर पेक्षा जास्त खोलीचे बोअर न घेण्याचा कायदा कोणीच पाळत नाही? यासह भूजल कायदा व आवश्यक उपाययोजना करण्याबाबत जलमित्रांनी प्रश्न उपस्थित केले.

नगरच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८० पाणलोट क्षेत्रापैकी १५ अतिशोषित, १४ अंशतः शोषित, ४७ पाणलोट क्षेत्र सुरक्षित असल्याची माहिती दिली.

 

दरम्यान, कनिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर, विनायक दरंदले, कारभारी गरड, सोमनाथ कचरे, दादासाहेब निकम, सीना भूजल व्यवस्थापनाचे (डोंगरगण) अध्यक्ष कैलास पठारे, बाळकृष्ण पुरोहित, शंकर नाबदे, सुहास पठाडे, अशोक पोहरकर, ग्रामीण संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, राजेंद्र वाघमारे, आदिनाथ म्हस्के, सहभागी झाले होते.

English Summary: Fear of underground drying due to deepening of borewell
Published on: 13 July 2021, 04:36 IST