1. बातम्या

आता शेतकरी होणार पत्रकार; कृषी जागरणचा महत्वाकांक्षी उपक्रम

नवी दिल्ली- राष्ट्रीय कृषी पत्रकारितेत नवा मापदंड निर्माण करणाऱ्या कृषी जागरण समुहाने नवी मोहिम हाती घेतली आहे. माध्यमांच्या वेगवान प्रवाहात शेतकऱ्यांना सामील करण्यासाठी ‘शेतकरी-एक पत्रकार’ (farmer the journalist) उपक्रमास सुरूवात केली आहे. आपल्या परिसरातील शेतीविषयक घडामोडींना प्रकाशित करण्याचे सशक्त माध्यम उपलब्ध होणार आहे. मध्य प्रदेश शेतकरी कल्याण आणि कृषी विकास मंत्री कमल पटेल यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
farmer journalist

farmer journalist

नवी दिल्ली- राष्ट्रीय कृषी पत्रकारितेत नवा मापदंड निर्माण करणाऱ्या कृषी जागरण समुहाने नवी मोहिम हाती घेतली आहे. माध्यमांच्या वेगवान प्रवाहात शेतकऱ्यांना सामील करण्यासाठी ‘शेतकरी-एक पत्रकार’ (farmer the journalist) उपक्रमास सुरूवात केली आहे. आपल्या परिसरातील शेतीविषयक घडामोडींना प्रकाशित करण्याचे सशक्त माध्यम उपलब्ध होणार आहे. मध्य प्रदेश शेतकरी कल्याण आणि कृषी विकास मंत्री कमल पटेल यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

 

 कृषी जागरण (Krishi Jagran)  आणि कृषी वर्ल्डचे मुख्य संपादक एम. सी. डॉमिनिक यांनी स्वतंत्र कृषी पत्रकारितेला नवा आयाम दिला. फार्मर फर्स्ट’ ही अभिनव संकल्पना आखली तसेच, शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने शेतकरी ब्रँडच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

माध्यमांच्या जगात शेतकरी:

राष्ट्रीय अर्थकारणात कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी शेतकऱ्यांचे सक्षमीकरण अत्यंत महत्वाचे आहे. अचूत व वेगवान माहिती प्रसारातून शेतकऱ्यांना माहितीप्रदान करण्यासाठी माध्यमांचे क्षेत्र महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे शेती व शेतीविषयक प्रश्नांना मुख्य प्रवाहात स्थान देण्यासाठी ‘शेती-एक पत्रकार’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

असे व्हा सहभागी:

शेतीविषयक नवीनतम माहितीशी संबंधित दर्जेदार व्हिडिओ पाठवावा लागेल. कृषी जागरणसाठी स्वतंत्र व्हिडिओ किंवा लेखाची निर्मिती करावी लागेल. व्हिडिओचा कालावधी 3 ते 5 मिनिटांचा असावा. व्हिडिओ पाठविल्यानंतर प्रकाशनाचे अधिकार कृषी जागरणकडे असतील.

व्हिडिओ व्यतिरिक्त आपण कृषी संबंधित माहिती आणि बातम्या लेखांच्या स्वरूपात पाठवू शकता. कृषी जागरणच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.

सशक्त आशय, दमदार पुरस्कार:

लेख व व्हिडिओ संख्येनुसार साठी स्वतंत्र स्वरुपात आर्थिक मानधन दिले जाणार आहे.

15 लेख आणि व्हिडिओवर 5 हजार रुपये

10 लेख आणि व्हिडिओंवर 2,500 रुपये

5 लेख आणि व्हिडीओवर 1 हजार रुपये

कृषी जागरणच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या मजकूराला म्हणजेच व्हिडिओ तसेच लेखाला पुरस्कार स्वरुपात मानधन दिले जाईल. या व्यतिरिक्त, सहा महिन्यांत 15 लेख व व्हिडिओ पाठविणाऱ्या कृषी पत्रकारांना प्रमाणपत्र पाठविले जाईल.

नोंदणी प्रक्रिया:

तुम्ही krishijagran.com/ftj वर नोंदणी करू शकतात.

कृषी जागरणच्या खालील मोबाईल नंबर वर देखील संपर्क करू शकतात-

98918991979953756433

आमचा व्हॉट्स-अप नंबर9818893957

तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुमचे व्हिडिओ तसेच बातम्या journalist@krishijagran.com वर मेल करू शकतात.

तुमच्याद्वारे पाठविण्यात आलेले लेख व व्हिडिओची नोंदणी केल्यानंतर आपणांस स्वतंत्र ईमेल आयडी प्रदान करण्यात येईल. 

English Summary: fartmer can become jornlist the undertaking progamme of krishijagran media Published on: 25 September 2021, 04:41 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters