सरकारने चालू केलेली पंतप्रधान पीक विमा योजनेला १३ जानेवारी २०२१ला पाच वर्ष झाली आहेत. दर वर्षी ५.५ कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून आपल्या पीक नुकसानीची भरपाई मिळवत असतात. पीएमएफबीवायच्या मार्फत पीक नुकसानीचा दावा करुन लाभार्थी शेतकऱ्यांना ९० हजार कोटी रुपये आधीच देण्यात आली आहेत.
सरकारने चालू केलेली पंतप्रधान पीक विमा योजनेला १३ जानेवारी २०२१ला पाच वर्ष झाली आहेत. दर वर्षी ५.५ कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून आपल्या पीक नुकसानीची भरपाई मिळवत असतात. पीएमएफबीवायच्या मार्फत पीक नुकसानीचा दावा करुन लाभार्थी शेतकऱ्यांना ९० हजार कोटी रुपये आधीच देण्यात आली आहेत.
दरम्यान बजाज अलियान्झ जनरल विमा कंपनी आपल्या फार्मामित्र या ग्राहक मोबाईल ऍपच्या माध्यामातून शेतकऱ्यांना सातत्याने पीएमएफबीवायची मार्फत चांगली सेवा प्रदान करते. साधरण ३ लाख शेतकरी हे ऍप वापरत असून पीक विमा आणि इतर कृषी सेवाचा लाभ यातून घेत आहेत. यात असलेल्या २० सेवांमध्ये सरासरी ५० हजार शेतकरी सक्रिय आहेत. फार्मामित्र हे ऍप देशातील १३ राज्यांमध्ये त्यांच्या भाषेत कार्यरत असून ही सेवा पुर्णत: मोफत आहे.
खालील मुख्य सेवा फार्मामित्रमध्ये आहेत:
कृषी सेवांचा समावेश
आठवड्याच्या ७ दिवशी प्रत्येक तासाला हवामान अंदाज वर्तवला जातो आणि निर्दिष्ट क्षेत्रात अलर्टही पाठवला जातो.
आपल्या जवळील बाजार समित्यांतील शेतमालांचा बाजारभाव.
पीक लागवडीसाठी आणि ठराविक वेळेतील कार्याची योजनांविषयी वैयक्तिक पीक सल्ला.
पीकाला झालेली बाधा समजण्यासाठी आणि निराकरणासाठी दृश्यातून पीक निदान
आपल्या परिसरातील समुदायांचा मंच दैनिक बातम्या/लेख
फार्मामित्राच्या लाय्रबरी विभागात विविध वर्गवारीत दोन हजारपेक्षा जास्त लेख, जसे की, यशोगाथा, शिक्षण,शेती, व्हिडिओज्, विमा, पशुसंवर्धन आदी.
पाच दर्शवणाऱ्या सेवा मंजूर बियाणे चाचणी प्रयोगशाळेचा शोध, माती परीक्षण प्रयोगशाळा, खते विक्रेते, शीतगृहे, कीटकनाशकांची माहिती.
विमा सेवांचा समावेश
जलद आणि चांगल्या दाव्याच्या मूल्यांकनासाठी ४० सेकंदापेक्षा कमी वेळेचा व्हिडिओ रेकॉर्डिग करुन आत्म- सर्वेक्षण करुन दोन मिनिटात होईल दावा.
वेळेवर आपल्याला पिकांच्या क्लेमची स्थिती कळेल
बँक खातेची सुधारणा विनंती पाठवा
अर्ज परत केलेल्या प्रकरणांसाठी, पीक विमा अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करा
बजाज शेतकऱ्यांना त्यांचा अर्ज, पॉलिसी, आणि क्लेम स्थिती आपला अर्ज नंबर किंवा बॅक खाते क्रमांक देऊन कधीही आणि कोणत्याही वर्षी पाहू शकतील याची हमी देते
हेल्प या विभागाचा उपयोग करुन आपल्या समस्या आपल्या भाषेत दाखल करा आणि ७२ तासाच्या आत त्यावरील उत्तर जाणून घ्या
प्रीमियम आणि विम्याची गणना या कार्यामधून पीएमएफबीवायविषयीची माहिती सरकारी पोर्टलबद्दल संपूर्ण तपशील तपासा, पीक विमा आणि इतर माहितीवर प्रवेश करा,भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी हे खुले आहे.
या ऍपचे वापरकर्ते दुचाकी आणि कार, आरोग्य विमाही खरेदी करू शकतील.
दर महिन्याला २ लाख शेतकरी फार्मामित्रामार्फत अर्ज दाखल करतात आणि क्लेम स्थिती जाणून घेतात. याशिवाय टोल फ्री नंबरवरुन संपर्क करुन शाखेत जाण्याचा वेळ वाचतो. फार्मामित्र सातत्याने विकसीत होत असून नव -नवीन वैशिष्ट्ये आहेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत होईल यासह विम्या संबंधित तक्रारीपण जोडले जातील.
https://bit.ly/3pvG6Nb या लिंकवर क्लिक करुन फार्मामित्र ऍप डाऊनलोड करु शकतात.
अशिष अग्रवाल
प्रमुख -ऍग्री. बीझनेस,
बजाज अलियान्झ जनरल विमा को.
Published on: 24 February 2021, 11:49 IST