भारत हा एक कृषीप्रधान देश मानला जातो. आपल्या देशातील बहुतांशी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु असे असूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. यामुळेच अशा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) सारख्या विविध योजना राबवते, ज्याद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होतो.
वास्तविक पाहता, शेतकऱ्यांना फारसा नफा न मिळण्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांची पारंपरिक शेती. परंतु शेतकऱ्यांनी मागणीमध्ये असलेल्या पिकांची लागवड केली तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशी अनेक प्रकारची झाडे आहेत, ज्या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव चांगला मोठा नफा कमवू शकतील. अशाच झाडांपैकी एक आहे निलगिरीचे झाड. मुलता हे झाड ऑस्ट्रेलियन वंशाचे आहे. मात्र असे असले तरी भारतात या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या झाडांचा वापर हार्ड बोर्ड, लगदा, पेटी इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. यामुळे या झाडाच्या लाकडाला बाजारपेठेत सदैव मागणी असते.
भारतात कुठे शेती केली जाते?:- भारतात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे निलगिरीची झाडे मोठ्या प्रमाणावर लावली जातात. मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांतील शेतकरी निलगिरीचे झाड लागवड करून चांगला नफा कमवतात. या झाडाची लागवड केल्यानंतर काही वर्षांतच बंपर नफा मिळायला सुरवात होते.
निलगिरीचे झाड उंच वाढते:- निलगिरीच्या झाडांच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर हे इतर झाडांच्या तुलनेत खूप उंच वाढते. सहसा या झाडाची उंची 40 ते 80 मीटर पर्यंत असू शकते. ही झाडे लावताना एकमेकांमध्ये दीड मीटरचे अंतर ठेवावे. अशा प्रकारे तुम्ही एका एकरात 1500 हून अधिक झाडे लावू शकता.
पाणी व्यवस्थापन:- निलगिरीची झाडे लावल्यानंतर पाणी व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे ठरते, या झाडाला शेतात लागवड केल्यानंतर लगेचच पाण्याची गरज असते. मात्र या झाडाला पावसाळ्यात पाणी देण्याची गरज भासत नाही, परंतु जर पावसाळा कमी झाला किंवा दुष्काळ पडला, तर गरजेनुसार पाणी द्यावे लागणार आहे. मुख्यतः उन्हाळी हंगामात आणि थोड्याफार प्रमाणात हिवाळ्यात पाण्याची गरज भासते.
Published on: 17 April 2022, 10:09 IST