News

शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.जेणेकरून कृषी क्षेत्रातील विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच या योजनांमधील एक महत्त्वाची योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा विचार केला तर ही राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून राबवण्यात येते व या अंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.

Updated on 22 August, 2023 9:55 AM IST

यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजेच फळबाग लागवडीकरिता आवश्यक खड्ड्यांची खोदाई, ठिबक सिंचन इत्यादी कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेमध्ये पंधरा फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने 6 जुलै 2018 रोजी ही योजना राबवण्यास मान्यता दिलेली असून यामध्ये कलम लागवड करणे तसेच पीक संरक्षण,

नांग्या भरणे, पाणी देण्याकरता ठिबक सिंचनाची व्यवस्था इत्यादी कामे करण्याकरता शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळते. यापैकी ठिबक सिंचनाचे जे काही अनुदान हे ते राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्यामुळे त्याऐवजी आता खतांकरीता अनुदान येण्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

आवश्यक खतांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

 फळबाग लागवडीच्या माध्यमातून ठिबक सिंचन करण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान मिळते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी  100% अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देखील राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

एवढेच नाही तर राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी केले. तसेच त्यांनी पुढे म्हटले की जर गरज भासली तर शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

English Summary: Farmers will now get 100 percent subsidy for this, read information
Published on: 22 August 2023, 09:55 IST