News

गेल्या काही दिवसांपासून खंताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आता बियाणे आणि खते (Seeds and fertilizers) केंद्र सरकारकडून मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिली.

Updated on 02 May, 2022 3:37 PM IST

गेल्या काही दिवसांपासून खंताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आता बियाणे आणि खते (Seeds and fertilizers) केंद्र सरकारकडून मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिली. केंद्र सरकारकडून (Central Government) राज्यासाठी 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार आहे, त्याला केंद्र सरकारने तत्वता मान्यता दिली असल्याचे भुसे म्हणाले.

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, यावर्षी कोणालाही बियाणे, रासायनिक खते कमी पडणार नाहीत. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीचे काम सुरु होते. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे कोणालाही अन्नधान्य कमी पडले नाही. कोणालाही फळे, दूध, अन्नधान्या कमी पडले नसल्याचे दादाजी भुसे म्हणाले. कृषी योजनांचा 50 टक्के लाभ महिलांना मिळणार आहे. लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...

देशाची, राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी सावरली आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना कस पिकवायचे हे सांगणे गरजेचे नाही, पण पिकवलेला माल कसा विकायचा हे सांगण्याचे काम कृषी विभाग करणार असल्याचे भुसे म्हणाले. कृषी क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला.

Jackfruit : फणस प्रक्रिया आणि आरोग्यदायी फायदे

नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात दादाजी भुसे बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या :
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
माती परीक्षण काळाची गरज...

English Summary: Farmers will not be short of seeds and fertilizers : Agriculture Minister Dadaji Bhuse
Published on: 02 May 2022, 03:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)