Cabinet approves interest subvention: देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे.
माध्यमांना माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बैठकीत शेतकऱ्यांना कर्जावर विशेष सूट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Minister of Youth Affairs and Sports of India, Anurag Thakur)
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावर आता १.५ टक्के सूट देण्याची तरतूद असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
हे ही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, महागाई भत्त्यात वाढ
सर्व वित्तीय संस्था शेतकऱ्यांना कर्जावर विशेष सवलत
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयानुसार 2022-23 ते पुढील वर्ष 2024-25 पर्यंत अतिरिक्त अर्थसंकल्पाची (India) तरतूद करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सरकारने या योजनेसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी 34,856 कोटी रुपयांचे अतिरिक्त बजेटही ठेवले आहे.
हे ही वाचा: Onion Rate: कांदा दराचा प्रश्न पेटला; कांदा उत्पादक संघटनेने घेतला मोठा निर्णय
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या व्याज सवलतीमध्ये सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचा समावेश होतो.
म्हणजेच देशातील शेतकऱ्यांना सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका ते लघु वित्त बँका यांच्याकडून अल्प मुदतीच्या कर्जावर विशेष सवलत मिळू शकेल.
हे ही वाचा: 2 एकर शेतीतून 12 लाखांपर्यंत कमाई! किवी बनवणार शेतकऱ्यांना मालामाल
Published on: 18 August 2022, 09:37 IST