भारत कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे देशाची जीडीपी ही शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अधिक अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना शेतीमधून अधिक उत्पादन प्राप्त करता यावे यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना (Government Scheme) कार्यान्वित केल्या जातात.
सरकार, बँक, प्रायव्हेट कंपनी वेगवेगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या योजना (Farmers Scheme) आणत असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) देखील शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टर अत्यंत उपयोगी साधन आहे. या आधुनिक युगात ट्रॅक्टर विना शेती करणे जवळपास अशक्यच आहे. अगदी पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत सर्व ठिकाणी ट्रॅक्टरची नितांत आवश्यकता असते.
असे असले तरी, प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करणे अशक्य आहे. पैशांची पुरेशी उपलब्धता होत नसल्याने अनेक शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी पासून वंचित राहतात. परिणामी त्यांना भाडे तत्वावर ट्रॅक्टर लावावे लागते आणि आपल्या मशागतीची तसेच काढणीची कामे करावी लागतात. यामुळे शेतकरी बांधवांचा अधिकचा वेळ खर्च होत असतो शिवाय पैसा देखील अधिकचा खर्च होतो.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आता शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल मात्र पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण की, देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने एक योजना अमलात आणली आहे, यामुळे शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी साठी कर्ज (Loan for the purchase of tractor) उपलब्ध करून दिले जाणार आहे फक्त कर्ज उपलब्ध होणार असे नाही तर बँक अनुदान देखील देणार आहे मात्र यासाठी काही निकष घालून दिले आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एसबीआयच्या ग्राहकांसाठी एसबीआय ने एक योजना आणली आहे. ही योजना एसबीआयने ट्रॅक्टर खरेदी साठी आणली आहे. याद्वारे ट्रॅक्टर घेण्यासाठी झटपट लोन दिले जाते.
यामध्ये ट्रॅक्टरची 100% किंमत विमा आणि नोंदणी शुल्क सुद्धा कर्ज म्हणून घेता येते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी चार ते पाच वर्षाचा कालावधी बँकेकडून दिला जातो. जे अत्यल्पअल्पभूधारक शेतकरी आहेत अर्थात ज्या शेतकर्यांकडे दोन एकर पेक्षा कमी शेतजमीन आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना डीलरद्वारे ट्रॅक्टर कोटेशन, लागवडीचा पुरावा, 6 पोस्ट डेटेड चेक (PDC) /ECS, ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रांची बँकेत पूर्तता करावी लागणार आहे. यामुळे निश्चितच अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेती क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे.
महत्वाची बातमी:-
मोठी बातमी! मोदी सरकार किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावासाठी लवकरच स्थापित करणार समिती
Published on: 03 April 2022, 02:34 IST