News

शेती आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि कृषी क्षेत्राचा विकास व्हावा असा दुहेरी उद्देश साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतीमध्ये विविध पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याकरिता देखील अनेक योजना आहेत.

Updated on 13 August, 2023 9:19 AM IST

शेती आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि कृषी क्षेत्राचा विकास व्हावा असा दुहेरी उद्देश साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतीमध्ये विविध पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याकरिता देखील अनेक योजना आहेत.

यामध्ये आपल्याला फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता असलेल्या योजना तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून यंत्रांच्या वापराला प्रोत्साहन मिळावे याकरिता यंत्र खरेदीवर अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. अगदी त्याच पद्धतीने बांबू लागवड व बांबू लागवडीचे फायदे या दृष्टिकोनातून देखील एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून या माध्यमातून बांबू लागवड शेतकऱ्यांना करता यावी याकरिता आर्थिक मदत दिली जात आहे.

 बांबू लागवडीसाठी असलेली शासनाची महत्त्वाकांशी योजना

 शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी अपेक्षा सरकारला आहे. याचा अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवड योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिली व ती म्हणजे आता ही बांबू लागवड योजना शेततळ्याच्या योजनेला जोडण्याचा निर्णय  घेतला जाणार असून लवकरच बांबूवर प्रक्रिया करणारे उद्योग देखील उभारले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ठिकाणी बांबू लागवड मिशन अंतर्गत बांबू लागवड व शेतकऱ्यांना त्यासंबंधीचे मार्गदर्शन करणारा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी बोलताना त्यांनी बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना अडीच वर्षात हेक्टरी साडेसात लाख रुपये मिळणार अशी ग्वाही दिली आहे. सध्या हेक्टरी साडेसहा ते सात लाख रुपये हे दिले जात असून त्यामध्ये बांबू लागवडीसाठी आवश्यक असणारी खड्डे ते बांबूची रोपे इत्यादीं करिता शासनाकडून अनुदान दिले जात आहे. 

तसेच बांबूचा समावेश आता एमआरइजीएस मध्ये करण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. जर आपण येणाऱ्या काही वर्षांचा विचार केला तर बांबूची मागणी प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मागील प्रमुख कारण म्हणजे इथेनॉल निर्मिती होय. इथेनॉल निर्मितीला चालना देण्याकरिता बांबूची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर बांबूची लागवड केली तर येणाऱ्या काळात ती त्यांना फायदेशीर ठरणार आहे.

English Summary: Farmers will get 7.5 lakh rupees if they cultivate this crop read information
Published on: 13 August 2023, 09:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)