News

राज्यातील किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. पण सरकारने किसान रेल्वे सुरू केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Updated on 24 August, 2020 1:14 PM IST

राज्यातील किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. पण सरकारने किसान रेल्वे सुरू केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आठवड्यातून एकदा किसान रेल्वे नाशिकमधील देवळालीहून मुझफ्फरपूरपर्यंत जात होती. दरम्यान आता एक आनंदाची बातमी रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेनुसार, किसान रेल्वेची वारंवारता आठवड्यातून दोनदा करण्यात येईल.

याविषयी माहिती सीआरचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली. शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतूक एकदम स्वस्त आणि कमी वेळेत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी याहून सोपे साधन नाही तसेच  रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुद्धा मोठयाने वाढ होण्यास मदत होते.  कोरोना विषाणूमुळे किसान रेल्वेच्या वाहतूकीत संकट येत होता पण हा त्रास आता संपला आहे. २१ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या सहाय्याने  देवळाली ते मुझफ्फरपूरपर्यंत महाराष्ट्रातून २३५ टन माल वाहून नेला होता. ज्यामध्ये डाळिंबासह लिंबू, फुलकोबी, मासे, मिश्र भाज्या, मिरची तसेच इतर कृषी उत्पादनांचा समावेश होता.  

सोलापूर येथील बेलवंडी स्टेशनवर पहिल्यांदाच शेतातील धन्याचा किसान रेल्वेमध्ये साठा करण्यात आला.  यामुळे या प्रदेशातील शेतकरी फार आनंदी झाले आणि त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. किसान रेल्वेबरोबर शेतकऱ्यांना इतर सेवा सुद्धा पुरवल्या जातील यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार, असे मध्य रेल्वेचे अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

 


किसान रेल्वेची सुरूवात वार्षिक अर्थसंकल्पात २०२०-२१ मध्ये सुरूवात केली गेली आहे. कृषी उत्पादनाबरोरबर कोल्ड प्रोडक्ट साठी याचा फायदा होणार आहे, जसे दुध ,मास  आणि मासळी इत्यादी. या रेल्वे सेवेचा फायदा फक्त मोठे शेतकरी नाही तर ज्यांच्याकडे लहान शेती भाग आहे. याना सुद्धा मिळू शकेल, या सेवेमुळे स्थानिक शेतकरी ,APMC , या शिवाय इतर कृषी उत्पादनाची उलाढाल करण्यास होणार आहे. किसान रेल्वे कोल्हापुरपासून -देवळाली- मुझफ्फरपूर या मार्गाने धावणार आहे, यामुळे भारतातील अनेक राज्यांना याचा फायदा होणार आहे.

English Summary: Farmers will benefit; Kisan Railway will run twice
Published on: 24 August 2020, 01:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)