1. बातम्या

किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांचं होणार भलं; जाणून घ्या !किसान रेल्वेचा प्रवास

KJ Staff
KJ Staff


पुणे : भारत सरकारने नुकतीच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी  देशातील पहिली किसान रेल्वे  ७ ऑगस्टला सुरू केली.  नाशवंत  कृषिमाल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात नेता यावा.  तसेच  शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने अशा प्रकारची रेल्वे सेवा महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये सुरू केली.  या रेल्वेसेवेविषयी अधिक माहिती घेणार आहोत.  नाशिक जिल्ह्यातून देशाच्या विविध राज्यांमध्ये द्राक्ष, कांदा, भाजीपाला, डाळिंब, टोमॅटो यांना मागणी असते. हा कृषीमाल कमी अवधीमध्ये सुरक्षित पोहोचावा यासाठी रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर अशी किसान रेलगाडी सुरू केली. पहिल्याच दिवशी देवळाली स्थानकातून २२ टन कृषीमाल रवाना करण्यात आला.

काय आहे किसान रेल्वेचा उद्देश :

भारत कृषीमाल साठवण क्षमतेचा अभाव, अपुरी वाहतूक व्यवस्था या कारणांमुळे ४०% नुकसान होते. त्यावर उपाययोजना करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही रेल्वे सेवा सुरू केली आहे.

काय आहे रेल्वेचे वेळापत्रक : ही रेल्वे आठवड्यातून एकदा देवळाली नाशिकवरून दानापूर, बिहारपर्यंत धावणार आहे.

 


किती अंतर कापणार : महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर हे १५१९ किमीचे अंतर ही रेल्वे ३१ तासात पूर्ण करणार आहे.

या रेल्वेचे थांबे कुठेकुठे असणार : देवळाली, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खांडवा, इतरांसी, जबलपूर, कातणी, माणिकपूर, प्रयागराज, चेवोकी, पंडित दीनदयाळ उपाध्यय नगर, बक्सर

काय काय वाहून नेणार : या गाडीमध्ये भाजीपाला, फळे याची मुख्यत्वे वाहतूक होणार आहे. तसेच या रेल्वेमध्ये शितयंत्रणा असल्यामुळे दूध, मांस, मासे यांची देखील वाहतूक होऊ शकते.

 

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters