News

कपडे आणि रंग-रुपावरून कोणत्याही माणसाची पारख करू नका, असे म्हणतात. शितावरून भाताची परीक्षा करू नये, अशी मराठीत म्हण आहे. कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यात एका कार कंपनीच्या शोरूममध्ये ही म्हण खरी ठरविणारी घटना उघडकीस आली आहे.

Updated on 25 January, 2022 11:22 AM IST

कपडे आणि रंग-रुपावरून कोणत्याही माणसाची पारख करू नका, असे म्हणतात. शितावरून भाताची परीक्षा करू नये, अशी मराठीत म्हण आहे. कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यात एका कार कंपनीच्या शोरूममध्ये ही म्हण खरी ठरविणारी घटना उघडकीस आली आहे. एक शेतकरी आपल्या मित्रांसोबत कार घेण्यासाठी शोरुमला पोहोचला. मात्र, त्याचे कपडे घाणेरडे असल्यामुळे सेल्समनन अपमान केला.

सेल्समनन गबाळ्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून हाकलून देतो. कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातील चिक्कासांद्रा हुबलीमधील रामनपाल्या येथील केम्पेगौडा आरएल नावाचा व्यक्ती सुपारीची शेती करतो. नवीकोरी एसयूव्ही घेण्यासाठी हा शेतकरी आपल्या मित्रांना घेऊन शोरुमला गेला. शोरुममध्ये शेतकऱ्याने महिंद्रा बोलेरो या गाडीबाबत चौकशी केली. मात्र शेतकऱ्याचा पेहराव पाहून सेल्समनने त्याची खिल्ली उडवली. परंतु अवघ्या 30 मिनटांमध्ये हा व्यक्ती 10 लाख रुपयांची रोकड घेऊन येतो आणि सेल्समनच्या तोंडावर फेकतो.

केम्पेगौडा आरएल याने दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करण्याची आणि त्याच दिवशी एसयूव्ही त्याच्या घराबाहेर उभी करण्याची ऑफर दिली होती. याला सेल्समनने नकार दिला. अखेर शेतकऱ्याने 10 लाख रुपये कॅश देतो पण आजच कार द्या असे म्हटले. परंतु सेल्समनने त्याची खिल्ली उडवली. आणि खिशात 10 रुपये तरी आहे का असे विचारले ?

अपमान झाल्यानंतर शेतकरी निघून गेला. पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी मित्रांना बोलावले. नंतर अवघ्या 30 मिनिटांमध्ये 10 लाखांची जमवाजमव करत केम्पेगौडा आरएल पुन्हा शोरुमला पोहोचला. यामुळे सेल्समनची फजिती झाली.

यानंतर कारची डिलीव्हरी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागेल असे सेल्समनने सांगितल्याने शेतकऱ्यांनी शोरुमबाहेर राडा घातला. पोलिसात तक्रार दाखल केली. शोरुम चालकाने आणि अधिकाऱ्यांना आमचा अपमान केल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले, असून माफी मागितली नाही तर आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

English Summary: Farmer's voice should be heard! The salesman insulted; The farmer threw 1 million in the face
Published on: 25 January 2022, 10:04 IST