शेतकरी कधी काय करेल याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. यामुळे अनेक शेतकरी नेहेमी चर्चेत असतात. आता शेतकऱ्याने ज्वारीच्या कणसाला पक्षांपासून संरक्षण मिळण्यासाठी 'देसी जुगाड' केले आहे, याची सध्या चर्चा सुरु आहे. आधी गोफणीच्या माध्यमातून पक्षांना भीती दाखवली जात होती. मात्र यामध्ये पक्षांना इजा होण्याची शक्यता असल्याने पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. आता या शेतकऱ्याच्या जुगाडामुळे मात्र पक्षांना सुद्धा काय होणार नाही, आणि पिकाचे देखील संरक्षण होणार आहे. सध्या ज्वारीचे पीक अंतिम टप्यात आले असून याची आता काढणी सुरु होईल. यामुळे शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपड करत आहेत.
सध्या चांगली कणसं तयार झाली असून त्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आगोदर शेतामध्ये बुजगावणी घालून देखील पक्षांना भीती दाखवली जात होती. मात्र आता शेतकर्यांनी एक नवा जुगाड शोधून काढत ज्वारीच्या कणसांना प्लास्टिकच्या पिशव्या घातल्या आहेत. यामुळे पक्षांच्या हाती काहीच लागत नाही. पक्षांना ज्वारीचे दाणे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र खाता येत नाहीत. हे प्लास्टिक उन्हामुळे चमकत असल्यामुळे पक्षी देखील जवळ येत नाहीत. यामुळे याचा फायदा होत आहे.
कडक ऊन असले तर हा कागद चमकत देखील आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकाचे राखण करण्याची गरज नाही. राज्यात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अहमदनगर जिल्हयातील नेवासे बुद्रूक, भालगाव, घोडेगाव, नारायणवाडी, तामसवाडी येथे मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. नेवासे तालुक्यात यंदा ज्वारी केवळ एक हजार 200 हेक्टरवर पेरणी केली आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या तिथं पक्षांचे थवे मोठ्या प्रमाणात येऊन धान्य फस्त करतात. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे हा जुगाड आता फायद्याचा ठरत आहे.
सध्या अनेक ठिकाणी हुर्डा पार्टीचे आयोजन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. ज्वारीच्या अशा अवस्थेत ज्वारीच्या कणसाचे संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिक पिशव्यांचे आवरण कणसाला शेतकऱ्यांनी घातले आहे. अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत. यामुळे आता चांगले उत्पादन होण्यास मदत होणार आहे. यामुळे आता अनेकांनी असेच आपल्या पिकाचे संरक्षण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
Published on: 28 January 2022, 04:45 IST