News

बारामती शहरातील सुशोभीकरणाच्या (Embellishment) माध्यमातून निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण झाले. यानंतर या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली तेव्हा याला हळूहळू शेतकरी विरोध करायला लागले.

Updated on 21 August, 2022 12:50 PM IST

बारामती शहरातील सुशोभीकरणाच्या (Embellishment) माध्यमातून निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण झाले. यानंतर या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली तेव्हा याला हळूहळू शेतकरी विरोध करायला लागले.

शेतकऱ्यांचा (farmers) विरोध यासाठी झाला की, आपल्या विंधन विहिरी आणि कालव्याच्या कडेच्या विहिरी यांचे पाणी जाईल आणि आपला भाग ओसाड होईल. मात्र या शेतकऱ्यांच्या विरोधाला हळूहळू राजकीय वळण देण्यात आले.

यानंतर निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला सध्या ब्रेक देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात जलसंपदा खात्याच्या (Water Resources Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील हे काम थांबवण्यात आले असल्याचे म्हंटले आहे.

ड्रोन बनवण्यात स्वदेशी नारा!! भारतात तयार होत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रोन, अनुदानही जास्त

हे काम थांबल्यानंतर शेतकऱ्यांचा हा विजय आहे असे काहींनी म्हंटले आहे. परंतु भविष्यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आणि राहणार असे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर वर्षानुवर्षी कालव्याच्या वितरिकेवर अवलंबून असणारे शेतकरी (farmers) या निर्णयाने सुखावले होते तर कालव्याच्या कडेला एक- दोन गुंठे, चार गुंठे जमिनी घेऊन ज्यांनी तेथे विहिरी खोदून पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावरील इतर गावांमधील आपली शेती बागायती केली असे शेतकरी मात्र अस्वस्थ झाले होते.

'या' राशीच्या लोकांचे भाग्य सूर्य प्रकाशासारखे चमकणार; वाचा तुमचे राशीभविष्य

परंतु अस्तरीकरणाच्या निर्णयामुळे ज्यांना फायदा (profit) होऊ शकला असता व आवर्तनाचा कालावधी कमी होऊन वेळेवर व पुरेसे पाणी मिळाले असते, असे शेतकरी आता नव्याने आंदोलन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अस्तरीकरणाला विरोध करणारा एक गट आणि अस्तरीकरणाचे समर्थन करणारा एक गट अशा दोन गटांची स्पर्धा येत्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या काही दिवसात बारामती आणि इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी याच्या बैठका सुरू झाल्याने हे आंदोलन उग्र आणि तीव्र स्वरूप धारण करेल याची कुणकूण लागताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी (political officers) देखील यामध्ये हस्तक्षेप केला आणि हे अस्तरीकरणाचे काम तूर्तास थांबवण्यासाठी सूचना दिल्यानुसार काम थांबविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 
सरकार म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतोय, फ्लॉवरची आली साडेनऊ रुपयांची पट्टी, शेती करायची तरी कशी?
शेतकरी मित्रांनो 'या' यंत्राने करा कमी खर्चात पीक फवारणी; पैशांची होईल मोठी बचत
शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र

English Summary: Farmers victory defeat Adjournment lining Nira left canal
Published on: 21 August 2022, 12:16 IST