बुलडाणा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा "सहसचिवपदी" शेतकरी चळवळीतील ऋषीकेश बबनराव म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी ही नियुक्ती केली.
मूळचे चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ऋषिकेश म्हस्के गेल्या आठ वर्षांपासून शेतकरी, विद्यार्थी, सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.
गेल्याच वर्षी त्यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. ऋषिकेश म्हस्के यांचे Bsc (Agri), बायोटेक्नॉलॉजीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांनी स्वतःला शेतकरी चळवळीत झोकून दिले. शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज, नुकसान भरपाई यासह इतर मुद्द्यांवर त्यांनी विविध आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. रास्ता रोको, निदर्शने, धरणे, उपोषण यामाध्यमातून त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे.
विद्यार्थी शिष्यवृत्ती, फी माफी, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण असून तेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात असा ठाम विश्वास असल्याने ऋषिकेश म्हस्के यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा "सहसचिवपदी" नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, पालकमंत्री तथा अन्न, औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,युवक कार्यध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता रविकांत दादा वरपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश सरचिटणीस गौरव शिंगणे जिल्हा कार्याध्यक्ष मनीष बोरकर यांच्या मान्यतेवरुन ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Published on: 16 May 2022, 07:57 IST