Nashik News :
नाशिक जिल्ह्यात काल (दि.६) मध्यरात्री पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने चांगलीच दडी दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तसंच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका पाऊस नसल्यामुळे बसलेला आहे. अनेक ठिकाणील बागा उकडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
कांदा, मका आणि भाजीपाला पिकांचे देखील पावसाअभावी नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये पेरण्या झालेल्या नाहीयेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचा संकट उद्भवलेलं आहे. या परिस्थितीमध्ये काल पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आता तरी जोरदार पाऊस होईल आणि शेतकऱ्यांवरच संकट दूर होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी अद्यापही मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात पावसाच्या आगमनाचे स्वागत केले आहे. तर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
धुळे जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. या भागातील शेतकरी काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. तर पाण्याअभावी पीके जळण्याच्या मार्गावर होती. मात्र बुधवारी पावसाने हजेरी लावण्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने धावपळ नागरिकांची धांदल उडाली झाली.
शिंदखेड्यात विजांसह हजेरी
शिंदखेडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. वादळी वारे, विजेच्या गडगडाटासह या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात १ लाख पैकी ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पाऊस नसल्याने २५ हजार हेक्टरवर पेरणी झाली नाही.
Published on: 07 September 2023, 04:39 IST