News

महा विकास आघाडी सरकारने मागील खरीप हंगामात मोठा गाजावाजा करत, 15 ऑगस्ट 2021 रोजी माझी शेती, माझा सातबारा अन माझं पिक असा जयजयकार करत शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आव्हान केले होते. त्या अनुषंगाने राज्यातील जवळपास 98 लाख शेतकऱ्यांनी पिकाची माहिती स्वतः ऑनलाइन पद्धतीने भरली होती. अचूक नोंद केलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देखील मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 13 February, 2022 12:35 PM IST

खरीप हंगामात महा विकास आघाडी शासनाचा हा उपक्रम बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याने त्यांनी रब्बी हंगामात देखील या उपक्रमाला राबविले आहे. ई-पीक पाहणी अंतर्गत, शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या दोन दिवसात ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी व्यवस्थित रित्या करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात लागवड केलेल्या पिकांची माहिती अथवा नोंद ई पीक पाहणी या महाराष्ट्र शासनाच्या एप्लीकेशन द्वारे करावी लागणार आहे. एप्लीकेशन अद्ययावत करण्यात आले आहे मात्र जशी खरीप हंगामात पीक नोंदणीची प्रक्रिया होती तशीच प्रक्रिया या हंगामात देखील असणार आहे. 

यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कडे जाऊन पिकांची नोंद करण्याची गरज राहणार नाही आता शेतकरी राजा स्वतः त्याने पेरलेल्या पिकाची नोंद आपल्या सातबार्यावर करू शकतो. ई पीक पाहणी मध्ये पिकांची नोंद केली तर भविष्यात कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर नुकसान भरपाई या आधारानेच मिळणार आहे. रब्बी हंगामातील पिकांचा पेरा अवकाळी मुळे लांबला होता शासनाने देखील ही बाब लक्षात घेता पीक पाहणी मध्ये पीक नोंदणी करण्यासाठी या हंगामात मुदतवाढ दिली आहे. त्या अनुषंगाने 15 फेब्रुवारी हा दिवस शेवटचा ठरविण्यात आला आहे. 

म्हणजे या दोन दिवसात जर आपण पिक पाहणी मध्ये रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी केली नाही तर भविष्यात जर निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तर आपणास नुकसान भरपाई मिळणार नाही. रब्बी हंगामात मध्यंतरी अवकाळीचे सावट होते, त्यामुळे जर भविष्यात  असे काही अजून नैसर्गिक संकट आले कर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे ई पीक पाहणी मध्ये पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. या दोन दिवसात ज्या शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केलेली नसेल त्यांनी करून घ्यावी.

English Summary: farmers to get crop insurance do this work
Published on: 13 February 2022, 12:35 IST