News

केंद्र सरकारने शेतकरी वर्गाच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत. येत्या काही वर्षांत केंद्र सरकारने शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी हजारो नवनवीन योजना आमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर मदत सुद्धा होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

Updated on 03 September, 2022 2:56 PM IST

केंद्र सरकारने शेतकरी वर्गाच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत. येत्या काही वर्षांत केंद्र सरकारने शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी हजारो नवनवीन योजना आमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर मदत सुद्धा होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

पि एम किसान योजना:-

शेतकरी वर्गावर संकटांची मालिका ही कायमच असते त्यामुळे शेतकरी वर्ग नेहमीच अडचणीत असलेला आपल्या दिसत असतो, महागाई, अतिवृष्टी, दुष्काळ, दुबार पेरणी यामुळे शेतकरी त्रस्त झालेला असतो त्यामुळे यातून शेतकरी वर्गाला थोडी मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक योजना आमलात आणल्या आहेत.

त्यामधील एक योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 2 हजार रुपये या प्रमाणे वार्षिक 6 हफ्ते या मध्ये 12 हजार रुपयांची मदत शेतकरी वर्गाला मिळत असायची. परंतु कालांतराने ई केवायसी प्रकिया पूर्ण करणे या योजनेसाठी गरजेचे आहे. केंद्र सरकारने ई केवायसी प्रकिया ही 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परंतु बऱ्याच शेतकरी वर्गाने ही प्रकिया पूर्ण केली नाही.

हेही वाचा:-आवक घटल्यामुळे ड्रॅगन फ्रुटच्या दरात मोठी सुधारणा

 

7 सप्टेंबर ला अंतिम मुदत:-

ई केवायसी प्रकिया पूर्ण नाही केली तर या योजनेचा लाभ शेतकरी वर्गाला घेता येणार नाही त्यासाठी प्रत्येक शेतकरी वर्गाने ई केवायसी प्रकिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत आधार क्रमांकाला ई केवायसी करून घ्यावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. 12 वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

हेही वाचा:-गर्भाशय मुख कॅन्सरवर आली लस, केंद्र सरकारची घोषणा; सामान्य जनतेच्या खिशाला परवडेल

सप्टेंबर महिन्यात हप्ते वितरण:-

पी.एम. किसान योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यापासून हप्ते वितरीत केले जाणार आहे . सदर रक्कम ही आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकरी वर्गाने लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सीएससी सेंटर, आपले सेवा केंद्रामध्ये जावून किंवा शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलवर ई-केवायसी करावी.

English Summary: Farmers to do e-KYC with Aadhaar by September 7; Otherwise PM Kisan will not get further installments.
Published on: 03 September 2022, 02:56 IST