Latur News :
लातूरमध्ये टोमॅटोला दर नसल्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन निषेध केला आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर कमी झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
एका महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती २०० रुपये किलो पार झाल्या होत्या. त्यामुळे शेतकरी मालामाल झाले. पण आता पुन्हा एकदा टोमॅटोचे दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ लातूरमधील टोमॅटो उत्पादकांनी दर नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देत निषेध व्यक्त केला आहे. यामुळे सरकारने दराबाबत उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटोला भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला आहे. टोमॅटोच्या क्रेटला १०० ते २५० रुपये भाव मिळल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. दुष्काळाचे सावट आणि त्यातच टोमॅटोला भाव नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिला आहे.
Published on: 11 September 2023, 10:56 IST