आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असलेला तसेच सर्वात गोड पदार्थ म्हणून मानला जाणारा 'मध' या पदार्थाच्या मागणीत सद्यस्थितीला वाढ झालेली दिसून येते. देश-विदेशातही या पदार्थाच्या मागणीत वाढ झालेली आहे. बरेच शेतकरी बंधू मधुमक्षिका म्हणजेच मधमाशी पालन हा पारंपारिक शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून देखील करतात.
या व्यवसायात मधमाशींचे पालन करून त्यांपासून मध मिळवणे व ते मध विकणे हे असते. आणि या व्यवसायाला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारही आपल्या स्तरावर मदत करत असते.
मधमाशी पालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण घेणे तसेच जनजागृती करणे यांकरिता मधमाशीपालन विकास नावाची योजना, कृषी आणि कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाते. मधमाशीपालनातून केवळ मधाची विक्री एवढ्यापुरते मर्यादित नसून यांपासून अनेक गोष्टी बनवल्या जातात.त्यामुळे मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा मधमाशी डिंक, मधमाशी पराग यांसारखी उत्पादने घेतली जातात. या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे.
तुरीच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकनाचूर
शेतकरी वर्ग मधमाशीपालन या व्यवसायाकडे वळावेत यासाठी नाबार्डसोबत (NABARD) राष्ट्रीय मधमाशी मंडळ (NBB) देखील मधमाशी पालनासाठी आर्थिक मदत पुरवते शिवाय राष्ट्रीय मधमाशी मंडळ मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% पर्यंत अनुदान देते.
दिलासादायक ! महिन्याभरात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार, असे केले आहे नियोजन...
मधमाशी पालनासाठी दहा बॉक्स घेऊन देखील मधमाशी पालन करणे शक्य आहे. समजा एका बॉक्समध्ये ४० किलो मध आढळले तर एकूण मध ४०० किलो होईल. आणि मधाच्या किंमतीनुसार ३५० रुपये प्रति किलो दराने ४०० किलो विकल्यास १.४० लाख रुपये मिळतील. स्वखर्चचा विचार केला तर प्रति बॉक्सचा खर्च ३,५०० रुपये याप्रमाणे एकूण खर्च ३५,000 रुपये आणि यातून १,0५,000 रुपयांचा नफा होईल. त्यामुळे शेतकरी वर्गाला हा जोड व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
Published on: 22 April 2022, 05:57 IST