विद्यापीठातील दर्जेदार बहुवार्षिक चारापिकांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण
मराठवाड्यातील पशुपालकांची मोठया प्रमाणात असलेल्या गरज लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्प प्रक्षेत्रावर पंधरा एकर क्षेत्रावर सुधारीत चारापिकांची लागवड करण्यात आलेली आहे. कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते दि. १६ जुलै रोजी चारापिकांच्या ठोबांचा पुरवठ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार अधिकारी (पशुसंवर्धन) डॉ. कनले, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत दोन लक्ष ठोंबाचा परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास पुरवठा करण्यात आला असुन सन २०१८-१९ मध्ये एकुण २५ लक्ष ठोंबाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
मराठवाड्यातील पशुपालकांची मोठया प्रमाणात असलेल्या गरज लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्प प्रक्षेत्रावर पंधरा एकर क्षेत्रावर सुधारीत चारापिकांची लागवड करण्यात आलेली आहे. कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते दि. १६जुलै रोजीचारापिकांच्या ठोबांचा पुरवठ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संशोधन संचालकडॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार अधिकारी(पशुसंवर्धन) डॉ. कनले, वरिष्ठ शास्त्रज्ञडॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. अशोक जाधवआदींचीप्रमुख उपस्थिती होती. वैरण विकास कार्यक्रमांतर्गतदोनलक्ष ठोंबाचापरभणीजिल्हा परिषदेच्याजिल्हा पशुसंवर्धन कार्यालयासपुरवठाकरण्यात आलाअसुनसन२०१८-१९मध्ये एकुण२५लक्ष ठोंबाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी कुलगुरुमा. डॉ. अशोक ढवणम्हणाले की, मराठवाडयातदुग्धव्यवसायासमोठा वाव असुन चारापिकांची कमतरता ही पशुपालकांसमोर मुख्य समस्या आहे. दुग्धोत्पादनास चालनादेण्यासाठीविद्यापीठ प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या दर्जेदारसुधारितचारापिकांच्याठोंबाची पशुपालकांनीलागवडीसाठी उपयोगकरण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी संचालक संशोधनडॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर सतराबहुवार्षिकव दहाहंगामी चारापिकांचीठोंबे नाममात्र दरात विक्रीसाठी उपलब्धअसुनसद्यस्थिती व हवामानचारापिकांच्या लागवडीसअत्यंत उपयुक्त आहे.
सद्यस्थितीत संकरीत गो पैदास प्रकल्प येथील पंधरा एकर क्षेत्रावर बहुवार्षिक संकरीत नेपीयर गवताच्या जयवंत,गुणवंत,संपदा (डीएचएन-६),बीएनएच-१०,आयजीएफआरआय-७, सीओबीएन-५ इत्यादी चारापिकांच्या जाती उपलब्ध असुन पॅराग्रास,दशरथ,बहुवार्षिक ज्वार ही चारापिके विक्रीस उपलब्ध आहेत.
English Summary: Farmers take Fodder Crops Benefits announced by Dr. Ashok Dhawan VC, VNMKV, ParbhaniPublished on: 17 July 2018, 09:15 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments