यंदा राज्यात पोषक वातावरण असल्यामुळे वेळेत आणि भरघोस पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता. मात्र यावेळेस पाऊस लांबणीवर गेला असं असलं तरी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावलीआहे . काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यातदेखील वातावरणात बदल झाला होता. बुधवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे कित्येक भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आपण पहिले आहे. अशीच एक दुर्घटना घडली आहे लातूर जिल्ह्यात.
झाडाखाली आसरा घेणं पडलं महागात
लातूर जिल्ह्यातील किल्लारी शिवारात वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामध्ये वीज कोसळल्याने एका मेंढपाळाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. शिवाय 6 शेळ्याही यात दगावल्या आहेत. अचानक पाऊस आल्याने मेंढपाळ लहू घोडके यांनी आपल्या शेळ्यांसह जवळच असलेल्या एका झाडाचा आसरा घेतला. मात्र अचानकच त्याच झाडावर वीज कोसळली. आणि क्षणाधार्त होत्याच नव्हतं झालं. या दुर्घटनेत लहू घोडके यांचा जागीच मृत्यू झाला आणि शेळ्याही दगावल्या. यंदा सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे.
औसा तालुक्यातील हत्तरगा येथे रहिवाशी असणारे लहू घोडके हे शेळ्या चारण्यासाठी किल्लारी शिवारात जात असतं. त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच ते आपल्या शेळ्यांना घेऊन किल्लारी शिवारात गेले. मात्र अचानक पाऊस सुरु झाला. पावसात भिजू नये यासाठी त्यांनी जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाचा आसरा घेतला. पाऊस वाढल्याने शेळ्याही झाडाखाली आल्या. अचानक त्याच झाडावर वीज कोसळल्याने मेंढपाळासह शेळ्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी व दोन मुले आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14 खरीप पिकांसह 17 पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर
महसूल प्रशासन अधिकारी यांनी घेतली दखल
ही झालेली दुर्घटना समजताच महसूलच्या कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेत स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. तसेच ग्रामस्थांनी घोडके कुटुंबियांना मदत देण्याची मागणी केली आहे. बऱ्याचदा, अचानक पावसाला सुरुवात झाल्यावर नागरिकांची तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची बरीच तारांबळ उडते. विशेषतः ग्रामीण भागात शेतात काम करताना पाऊस आल्यावर जवळ असलेल्या झाडांचा आसरा बरेच जण घेतात. मात्र पावसात झाडाचा आसरा घेणं महागात पडू शकते.
महत्वाच्या बातम्या:
मान्सूनपूर्व पावसाची शेतकऱ्यावर अवकृपा; शेतकऱ्यांची सरकारकडे 2 लाखांची मागणी
मोठी बातमी! गहू निर्यात बंदीबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
Published on: 09 June 2022, 02:53 IST